IPL Auction ने एकारात्रीत बदललं आयुष्य, रिक्षावाला, फळवाला आणि पाणीपुरीवाल्याचा मुलगा झाला करोडपती

| Updated on: Feb 10, 2022 | 12:56 PM

मेगा ऑक्शन रोमांचक होण्याची शक्यता आहे. यंदा 12-13 फेब्रुवारीला बंगळुरुत मेगा ऑक्शन पार पडणार आहे.

1 / 7
IPL Auction ने एकारात्रीत बदललं आयुष्य, रिक्षावाला, फळवाला आणि पाणीपुरीवाल्याचा मुलगा झाला करोडपती

2 / 7
IPL स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटुंच्या कामगिरीची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते. क्रिकेटमधल्या नव्या टॅलेंटला प्रोत्साहन दिलं जातं. पण त्याचबरोबर खेळाडूंची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते. असे अनेक क्रिकेटपटू आहेत, जे IPL स्पर्धेमुळे रातोरात कोट्यधीश बनले आहेत. जाणून घेऊया अशाच काही खेळाडूंबद्दल

3 / 7
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा प्रवास खूपच रंजक आहे. त्याचे वडिल रिक्षाचालक होते. हलाखाची परिस्थिती असूनही मुलाला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. सिराजने सुद्धा मेहनत केली. अखेर 2017 मध्ये सनरायजर्स हैदराबादने 2.6 कोटी रुपये मोजून सिराजला आपल्या संघात घेतलं. IPL 2022 मध्ये RCB ने सात कोटी रुपये मोजून सिराजला रिटेन केलं आहे.

4 / 7
भारताचा वेगवान गोलंदाज टी.नटराजन सुद्धा एका गरीब कुटुंबातून वर आला आहे. वडील मजुरीचे काम करायचे, तर आई रस्त्याच्या कडेला दुकान लावायची. 2017 मध्ये पंजाबच्या संघाने 3 कोटी रुपयांना नटराजनला आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर नटराजनच आयुष्याच बदलून गेलं. तो भारतीय संघाकडून सुद्धा खेळला आहे.

5 / 7
चेतन सकारियाचा क्रिकेट प्रवास सोपा नव्हता. सकारियाची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्याचे वडिल रिक्षाचालक होते. IPL 2021 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने चेतन सकारियाला 1.2 कोटी रुपयांना विकत घेतलं. 2021 मध्ये चेतन सकारियाने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

6 / 7
युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला चार कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे. उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये जन्मलेला यशस्वी क्रिकेटर बनण्यासाठी वयाच्या 11 व्या वर्षी मुंबईत आला. रहाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तो एका तंबूत रहायचा. तिथे वीज-पाण्याची व्यवस्था नव्हती. यशस्वी आपला खर्च भागवण्यासाठी प्रॅक्टिस नंतर आजाद मैदानाजवळ पाणीपुरीचा स्टॉल लावायचा.

7 / 7
उमरान मलिक काश्मीरचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आहे. उमरानचे वडिल अब्दुल मलिक यांचं फळ-भाज्यांचं दुकान आहे. मेगा ऑक्शनआधी उमरान मलिकला SRH ने चार कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.