‘फॅन आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी आकाश चोप्रा काहीही बडबडत असतो’, Kieron Pollard ने काढला राग

| Updated on: Jun 03, 2022 | 6:22 PM

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्डने (Kieron Pollard) यंदाच्या IPL 2022 सीजनमध्ये खूप निराशाजनक कामगिरी केली. पोलार्डच्या खराब प्रदर्शनाचा मुंबई इंडियन्सवरही परिणाम झाला.

फॅन आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी आकाश चोप्रा काहीही बडबडत असतो, Kieron Pollard ने काढला राग
kieron pollard-akash chopra
Image Credit source: PTI/Twitter
Follow us on

मुंबई: वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्डने (Kieron Pollard) यंदाच्या IPL 2022 सीजनमध्ये खूप निराशाजनक कामगिरी केली. पोलार्डच्या खराब प्रदर्शनाचा मुंबई इंडियन्सवरही परिणाम झाला. लीगच्या इतिहासात प्रथमच Mumbai Indians ची टीम पॉइंटस टेबलमध्ये तळाला राहिली. मुंबई इंडियन्सने सलग आठ सामने गमावले. त्यानंतर मुंबईचा संघ कमबॅक करु शकला नाही. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने या टीमच्या खेळाडूंवर जोरदार टीका केली. यामध्ये कायरन पोलार्डच नावही होतं. कायरन पोलार्डला ही टीका सहन झाली नाही. त्याने सार्वजनिक रित्या सोशल मीडियावरुन या टीकेला उत्तर दिलं. कायरन पोलार्डने आकाश चोप्रा विरोधात टि्वट केलं. पण नंतर त्याने ते डिलीटही केलं. पण तो पर्यंत युझर्सनी त्याच स्क्रिनशॉटही काढले होते.

कायरन पोलार्ड एक गोष्ट विसरला

कायरन पोलार्डने जाहीरपणे आकाश चोप्राला टि्वटरवर उत्तर दिलं. ‘फॅन बेस आणि फॉलोअर्स वाढले असतील, असाच पुढे जा’ असं त्याने टि्वट केलं होतं. फक्त फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी आकाश चोप्रा अशी टीका करत असतो, असं कायरन पोलार्डला म्हणायचं होतं. पोलार्डने उत्तर दिलं. पण तो, हे विसरला की, तुम्ही चांगली कामगिरी केली नाही, तर तुमच्यावर टीका होणं स्वाभाविक आहे. चांगल्या कामगिरीनंतर चाहते खेळाडूंना डोक्यावर बसवतात, मग टीकेला काय घाबरायच?

टिम डेविडने उचलला फायदा

कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचा मोठा मॅच विनर आहे. पण या सीजनमध्ये तो फ्लॉप ठरला. पोलार्डने 11 सामन्यात 14.40 च्या सरासरीने 144 धावा केल्या. गोलंदाजी करताना त्याने फक्त 4 विकेट काढल्या. अशी वेळ आली की, शेवटच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्सने पोलार्डला आपल्या संघातून वगळलं. त्याचा फायदा टिम डेविडने उचलला. डेविडने तडफदार फलंदाजी करुन आपलं महत्त्व लक्षात आणून दिलं. मुंबई इंडियन्सला टिम डेविडच्या रुपात कायरन पोलार्डला पर्याय मिळाला आहे. पुढच्या सीजनमध्ये कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे.