Jasprit Bumrah Mumbai Indians: ‘प्लीज लवकर परत ये’, बुमराह पत्नी संजनाच्या आठवणीने व्याकूळ

Jasprit Bumrah Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची (IPL) सुरुवात येत्या 26 मार्चपासून होत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपला सहावा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Jasprit Bumrah Mumbai Indians: प्लीज लवकर परत ये, बुमराह पत्नी संजनाच्या आठवणीने व्याकूळ
जसप्रीत बुमराह-संजना गणेशन
Image Credit source: instagram
| Updated on: Mar 23, 2022 | 1:17 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची (IPL) सुरुवात येत्या 26 मार्चपासून होत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपला सहावा किताब जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्या नेट्समध्ये कसून सराव करतोय. गोलंदाजीमध्ये मुंबई इंडियन्सची भिस्त प्रामुख्याने जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) आहे. बुमराहने टीम इंडियाप्रमाणे मुंबई इंडियन्सला कधीही निराश केलेलं नाही. संघाला गरज असताना विकेट मिळवून दिल्यात. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, यॉर्कर चेंडू ही बुमराहची ताकत आहे. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीतील दाहकता दाखवून दिली. प्रतिस्पर्धी संघाचा बुमराहची गोलंदाजी खेळताना कस लागला. यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स नव्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार आहे. अनेक नवखे खेळाडू या टीममध्ये आहेत. त्यामुळे बुमराहवर जास्त जबाबदारी असेल.

बुमराह सरावामध्ये व्यस्त असला, तरी….

जसप्रीत बुमराह सध्या सरावामध्ये व्यस्त असला, तरी त्याला पत्नी संजना गणेशनची आठवण येतेय. जसप्रीत बुमराहने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करुन पत्नी बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. टि्वटरवर त्याने पत्नी संजनासोबतचा फोटो शेयर करताना ‘प्लीज लवकर परत ये’ असा मेसेज लिहिला आहे.

संजना न्यूझीलंडमध्ये, बुमराह मुंबईत

संजना एक अँकर असून ती न्यूझीलंडमध्ये आहे. न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. संजना आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत अँकरिंग करतेय. बुमराह इथे मुंबईत आपल्या मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. आयपीएलचे शेड्युल दोन महिने असून 29 मे रोजी शेवटचा सामना खेळला जाईल. महिला वर्ल्ड कप स्पर्धेत फायनल मॅच तीन एप्रिलला ख्राइस्टचर्चमध्ये होणार आहे.

मागच्या आठवड्यात दोघांच्या लग्नाचा वाढदिवस झाला

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन 15 मार्च 2021 रोजी विवाहबंधनात अडकले. मागच्या आठवड्यात त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस झाला. करीयरमधल्या जबाबदाऱ्यांमुळे दोघांना एकत्रितपणे लग्नाचा वाढदिवस साजरा करता आला नाही. बुमराह आयपीएलमध्ये मुंबईसाठी खेळत असून त्याला टीमने रिटेन केलं होतं. मुंबईच्या टीमने बुमराहला 12 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे.

आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये होणार आहे. 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्याने मुंबई इंडियन्स आयपीएलमधील आपलं अभियान सुरु करणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होईल.