Suryakumar yadav Mumbai Indians: फिट असूनही सूर्यकुमार संघात का नाही? रोहित शर्माने असं का केल?

Suryakumar yadav Mumbai Indians: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल 2022 (IPL 2022) मधला आपला दुसरा सामना खेळत आहे. समोर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे.

Suryakumar yadav Mumbai Indians: फिट असूनही सूर्यकुमार संघात का नाही? रोहित शर्माने असं का केल?
Suryakumar yadav
Image Credit source: BCCI
| Updated on: Apr 02, 2022 | 4:59 PM

नवी मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल 2022 (IPL 2022) मधला आपला दुसरा सामना खेळत आहे. समोर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. त्यामुळे आजचा राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना जिंकण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. या सामन्यासाठी रोहित शर्मा टॉससाठी आला, तेव्हा त्याच्या एका निर्णयाने सर्वांना हैराण केलं. रोहितला जेव्हा प्लेइंग इलेवनबद्दल विचारलं, तेव्हा त्याने संघात कुठलाही बदल नसल्याचं सांगितलं. दुखापतीमधून सावरलेल्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar yadav) संघात स्थान दिलं जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट असून तो निवडीसाठी उपलब्ध आहे, असं मुंबई इंडियन्स संघाशी संबंधित असलेल्या झहीर खान यांनी शुक्रवारी सांगितलं होतं.

का नाव नाही?

आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध जाहीर झालेल्या प्लेइंग इलेवनमध्ये त्याचं नाव नव्हतं. याच काय कारणं आहे, त्याबद्दल रोहितने टॉसच्या वेळी कुठलीही माहिती दिली नाही. “सूर्यकुमार यादव रिटेन केलेला खेळाडू असून टिमचा प्रमुख भाग आहे. आम्ही सगळेच त्याच्या मैदानावर उतरण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. पुढच्या सामन्याच्यावेळी तो निवडीसाठी उपलब्ध असेल” असे झहीर खान वर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाला होता.

टीम सोबत सराव केला नाही

सूर्यकुमार टीमसोबत वॉर्मअप करत नसल्याचं स्टार स्पोर्ट्सने सांगितलं होतं. दुखापतीमधून बरं झाल्यानंतरही सूर्यकुमार का खेळत नाहीय? यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. फेब्रुवारीमध्ये कोलकात्यात वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात त्याला क्षेत्ररक्षण करताना हेयरलाइनचा फ्रॅक्चर झालं होतं. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या फिटनेसवर मेहनत घेण्यात आली. तो सलामीच्या सामन्यात खेळला नाही.

…तर मुंबईच्या संघाला मिळाली असती बळकटी

सूर्यकुमार यादव संघात असता, तर मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीला आणखी बळकटी मिळाली असती. मागच्या सामन्यात त्याच्याजागी अनमोलप्रीत सिंहला संधी देण्यात आली होती. पण तो छाप पाडू शकला नव्हता. आज पुन्हा एकदा त्याला संधी मिळाली आहे.