
इंडियन प्रिमियर लीगचा (IPL) 15 वा सीजन सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. स्पर्धेचं शेड्यूल जाहीर झालं आहे. खेळाडूंनी तयारी सुरु केली आहे.

आयपीएलमधल्या एका प्लेयरने स्पर्धा सुरु होण्याआधी एक महत्त्वाचं कार्य उरकून घेतलं आहे. भारतीय क्रिकेट संघातील युवा लेग स्पिनर राहुल चाहरने लग्न केलं आहे. राहुलने बुधवारी 9 मार्च रोजी लग्न केलं.

राहुल आणि इशानी बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. 2019 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. राहुलने त्याचवर्षी भारतासाठी T 20 मध्ये डेब्यु केला होता. राहुलची पत्नी इशानी फॅशन डिझायनर आहे. आयपीएल सामन्यांच्यावेळी ती अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे.

राहुल आणि इशानीचं लग्न गोव्यात झालं. त्याचे फोटो समोर आले आहेत. राहुलने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यात हळदीपासून, संगीत आणि अन्य विधींचे फोटो आहेत.

राहुलच्या लग्नाच्यावेळी त्याचा भाऊ दीपक चाहर, त्याची भावी पत्नी जया भारद्वाज त्याशिवाय अंडर 19 वर्ल्डकप संघातील सहकारी शिवाम मावी आणि अन्य क्रिकेटपटू उपस्थित होते.

राहुल चाहरला मागच्याच महिन्यात IPL मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. राहुल याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. राहुलने भारतासाठी सहा टी 20 आणि एक वनडे सामना खेळला आहे. त्याने भारताकडून खेळताना 10 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या 42 सामन्यात त्याने 43 विकेट घेतल्या आहेत.