MS Dhoni संदर्भात CSK च्या चाहत्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी

| Updated on: Mar 29, 2023 | 9:18 AM

IPL 2023 CSK News : मैदानात जे दृश्य दिसलं, त्यामुळे CSK च्या टीम मॅनेजमेंटला नक्कीच घाम फुटू शकतो. सीएसकेने आतापर्यंत चारवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावल. या सगळ्या विजयांमध्ये एमएस धोनीची भूमिका महत्वपूर्ण राहिलीय.

MS Dhoni संदर्भात CSK च्या चाहत्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी
ipl 2023 csk ms dhoni
Image Credit source: IPL
Follow us on

IPL 2023 CSK News : इंडियन प्रीमिअर लीगच्या 16 व्या सीजनला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याने या सीजनची सुरुवात होणार आहे. चेन्नई म्हटलं की, सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो, एमएस धोनी. CSK टीमची सर्व भिस्त एमएस धोनीवर अवलंबून असते. मुंबई इंडियन्स खालोखाल चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील दुसरा यशस्वी संघ आहे. सीएसकेने आतापर्यंत चारवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावल. या सगळ्या विजयांमध्ये एमएस धोनीची भूमिका महत्वपूर्ण राहिलीय.

एमएस धोनी आता 41 वर्षांचा आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हाच निवृत्ती घेतलीय. मात्र तो अजूनही सीएसकेच नेतृत्व करतोय. सीएसकेला अजूनही धोनीचा पर्याय सापडलेला नाही. धोनीच्या वयाचे अन्य खेळाडू आयपीएलमधून कधीच निवृत्त झालेत. पण धोनी मात्र अपवाद आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटला घाम फुटू शकतो

याच एमएस धोनी संदर्भात एक बातमी आहे. निश्चितच यामुळे सीएसकेच्या चाहत्यांच टेन्शन वाढणार आहे. सीएसकेचे हे फॅन्स धोनी मॅजिकवर अवलंबून असतात. धोनीच्या फिटनेसमुळे चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटला यंदा घाम फुटू शकतो. कारण सीएसकेच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये हे दृश्य दिसलय.

हिरोसारखं स्वागत

धोनीचा डावा पाय दुखत होता. धाव घेताना तो लंगडताना दिसला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सोमवारी चाहत्यांकडून एमएस धोनीच हिरोसारखं स्वागत करण्यात आलं. सीएसकेने प्रॅक्टिस पाहण्यासाठी चाहत्यांना निमंत्रित केलं होतं.

सावधतेने पळताना दिसला

स्पोर्टस्टारनुसार, नेट्समध्ये उतरण्याआधी सुरुवातीला धोनीच्या मनात संकोच दिसत होता. डाव्या पायाला नीकॅप घालून तो मैदानात उतरला. धोनीने त्यानंतर पायावर जोर देत स्ट्रेचिंग केलं. स्टेडिममधील प्रेक्षकांचा गोंगाट सुरु असताना धोनी नेट्समध्ये गेला. नेट्समध्ये धोनी खूप सावधतेने पळताना दिसत होता. धावा घेताना तो खूप सर्तक दिसत होता.

सीएसकेसाठी ही चांगली बातमी नाही

धोनीच रनिंग बिटविन द विकेट उत्तम आहे. पण यावेळी धाव घेताना धोनी खूपच सावध दिसला. पायाच्या डाव्या गुडघ्यामध्ये त्याला त्रास जाणवत होता. तो मध्येच थांबला सुद्धा. गुजरात टायन्स विरुद्ध सामन्यासाठी 3 दिवस उरलेले असताना, सीएसकेसाठी ही चांगली बातमी नाहीय.