AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी साथ सोडल्यानंतर साक्षीने धरला धोनीचा हात

MS Dhoni : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी सोडली क्रिकेटरची साथ, पण कोणत्याही परिस्थितीत साक्षीने सोडली नाही माहीची साथ... ही प्रसिद्ध अभिनेत्री देखील होती धोनीची गर्लफ्रेंड...

MS Dhoni : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी साथ सोडल्यानंतर साक्षीने धरला धोनीचा हात
| Updated on: Mar 28, 2023 | 4:44 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध आणि दमदार खेडाळू म्हणजे एमएस धोनी. सामना सुरु असताना धोनी मैदानात उतरल्यानंतर चाहते टाळ्याचा कडकडात करायचे. आजही मैदानावरील धोनीची कामगिरी चाहत्यांच्या लक्षात आहे. धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाला देखील प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. सिनेमाच्या माध्यमातून धोनीने केलेला संघर्ष आणि त्याचं खासगी आयुष्य चाहत्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. आज धोनी पत्नी साक्षी हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण साक्षीच्या आधी धोनीच्या आयुष्यात अनेक तरुणी होत्या. आज धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेवू… (MS Dhoni relationship with actress)

प्रियंका झा : धोनीचं पहिलं प्रेम प्रियंका झा होती. प्रियंकावर धोनी प्रचंड प्रेम करायचा. त्याला प्रियंकासोबत लग्न देखील करायचं होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. प्रियंकाचं अपघातात निधन झालं. प्रियंकाच्या निधनानंतर धोनी पूर्णपणे कोलमडला होता.

अभिनेत्री दीपिका पादुकोण : धोनीचा नाव दीपिकासोबत देखील जोडण्यात आलं. जेव्हा दोघांच्या नावाची चर्चा रंगली, तेव्हा दोघेही त्यांच्या क्षेत्रात नवीन होते. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार, धोनी 2007 मध्ये दीपिका पदुकोणच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी दीपिका तिच्या ‘ओम शांती ओम’ सिनेमासाठी आणि धोनी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर चर्चेत होता. दोघांनी एकत्र अनेक रॅम्प वॉक देखील केलं. पण त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

अभिनेत्री राय लक्ष्मी : दाक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत देखील धोनी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. राय लक्ष्मी 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड अॅम्बेसेडर बनली होती. तेव्हा धोनी या संघाचा कर्णधार होता. पण अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री असिन : महेंद्र सिंग धोनी याचं नाव ‘गजिनी’ फेम अभिनेत्री आसिन हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. 2010 मध्ये धोनी आणि असिन एकाच ब्रँडचे प्रमोशन करत होते आणि त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. पण त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नात्याच्या चर्चा रंगल्यानंतर धोनीने ०४ जुलै २०१० मध्ये साक्षी हिच्यासोबत लग्न केलं. साक्षी आणि धोनी आज एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. साक्षी आणि धोनी यांना एक मुलगी देखील आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.