Naveen Ul Haq | “विराट सर…” , नवीन उल हक याच्याकडून कोहलीची माफी? ट्विट व्हायरल

| Updated on: May 25, 2023 | 8:29 PM

लखनऊ विरुद्ध बंगळुरु यांच्या सामन्यात 1 मे रोजी विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला होता. या वादात नंतर गौतम गंभीर यानेही उडी घेतली होती.

Naveen Ul Haq | विराट सर... , नवीन उल हक याच्याकडून कोहलीची माफी? ट्विट व्हायरल
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 वा मोसमात शुक्रवारी 26 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर 2 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणारी टीम अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध भिडणार आहे. आयपीएलच्या या मोसमात क्रिकेट विश्वाला अनेक स्टार खेळाडू मिळाले. अनेक अविस्मरणीय घटनाही या मोसमादरम्यान घडल्या. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 1 मे रोजी सामना खेळवण्यात आला. या सामन्यानंतर नवीन उल हक याच्यावरुन गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला. विरोट कोहली याच्या वादानंतर अखेर नवीन उल हक याला उपरती झाली आहे. नवीनने ट्विट करत विराटची जाहीर माफी मागितली आहे.

नक्की काय झालं होतं?

नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात या सामन्यादरम्यान झकाझकी झाली होती. त्यानंतर सामना संपला. यानंतर हस्तांदोलन दरम्यान विराट आणि नवीन पुन्हा भिडले. यानंतर या वादात लखनऊ टीमचा मेन्टॉर गौतम गंभीर याने उडी घेतली. नवीनमुळे गौतम गंभीर आणि विराट कोहली हे आयपीएल 2013 नंतर 2023 मध्ये पुन्हा भिडले. या दोघांमध्ये फक्त हाणामारीच व्हायची राहिली होती. मात्र वेळीच पंचांनी आणि सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. तेव्हापासून विराट आणि नवीन-गंभीर यांच्यात सामना रंगू लागला.

प्लेऑफ एलिमिनेटरमध्ये बुधवारी 24 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स भिडले. मुंबई इंडियन्सने या सामन्यात लखनऊवर 81 धावांनी विजय मिळवला. या पराभवासह लखनऊचा प्रवास इथेच संपला. या सामन्यानंतर नवीनने ट्विट करत विराटची माफी मागितली आहे.

नवीनच्या ट्विटमध्ये काय?

“विराट कोहली सरांची मी मनापासून माफी मागतो. विराट कोहली क्रिकेटचा ब्रँड आहे. मला त्यांच्या पायाच्या धुळीचीही सर नाही”, असं नवीनने म्हटलंय. मात्र या ट्विटची सत्यता काही वेगळीच आहे.

फेक नवीन उल हककडून फेक ट्विट

फेक अकाउंट फेक ट्विट

नवीनने असं काही ट्विट केलेलेच नाही. नवीन उल हक याच्या नावे हे फेक ट्विट अकाउंट तयार करण्यात आलं आहे. या फेक अकाउंटवरुन हे फेक ट्विट केलं गेलं आहे. त्यामुळे नवीनने विराटची माफी मागितल्याचा दावा हे खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे.