Rashid Khan Hat Trick | राशिद खान याची ऐतिहासिक कामगिरी, केकेआर विरुद्ध हॅटट्रिक

गुजरात टायटन्सच्या राशिद खान याने इतिहास रचला आहे. राशिद खान याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.

Rashid Khan Hat Trick | राशिद खान याची ऐतिहासिक कामगिरी, केकेआर विरुद्ध हॅटट्रिक
| Updated on: Apr 10, 2023 | 12:57 AM

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 13 वा सामना हा गुजरात जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत राशिद खान हा गुजरातचं नेतृत्व करतोय. कर्णधारपद सांभाळताना राशिद खान याने इतिहास रचला आहे. राशिदने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राशिद खान याने हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. राशिदच्या या हॅटट्रिकमुळे गुजरातचं सामन्यात कमबॅक झालं आहे.

अशी घेतली हॅटट्रिक

राशिद खान ओव्हर टाकायला आला. राशिदने तो ज्यासाठी ओळखला जातो, ती कामगिरी त्याने कली. आपल्या फिरकीसमोर त्याने केकेआरच्या 3 धोकादायक फंलदाजांना आऊट करत हॅट्रिक घेतली. राशिदने कोलकाताच्या डावातील 17 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये अनुक्रमे आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि शार्दुल ठाकूर या तिकडीला आऊट केलं. आयपीएलच्या इतिहासातील ही एकूण 22 वी तर या मोसमातील आणि राशिद खान याची पहिलीवहिली हॅटट्रिक ठरली.

एकूण चौथी हॅटट्रिक

दरम्यान राशिदच्या कारकीर्दीतील ही एकूण चौथी हॅटट्रिक ठरली. राशिदने आयपीएलआधी कॅरेबियन लीग, बिग बॅश लीग आणि इंटरनॅशनल टी 20 लीगमध्ये प्रत्येकी 1 अशा 3 हॅटट्रिक घेतल्या आहेत.

राशिद खान हॅटट्रिक

दरम्यान राशिद खान याने आपल्या एकूण 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये तब्बल 37 धावा दिल्या. राशिदची धावा देण्याबाबत चिवट अशी ओळख आहे. राशिद खान सहसा धावा देत नाही. त्याच्या बॉलिंगवर चौकार मारणं सुद्धा आव्हानात्मतक असंत. मात्र असं असलं तरी त्याने 4 ओव्हरमध्ये 9.20 च्या इकॉनॉमी रेटने 37 धावा लुटवल्या. तर त्या मोबदल्यात 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (क), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.