GT vs LSG Video : वृद्धिमान साहाने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात अशी कशी ट्रॅक पँट घातली, नेटकरी म्हणाले…

गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 56 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. हा सामना गुजरातने जिंकला असला तरी सोशल मीडियावर वृद्धिमान साहाच्या पँटची चर्चा रंगली आहे.

GT vs LSG Video : वृद्धिमान साहाने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात अशी कशी ट्रॅक पँट घातली, नेटकरी म्हणाले...
GT vs LSG : लखनऊ विरुद्धचा सामना गुजरातने जिंकला खरा पण चर्चा रंगली ती वृद्धिमान साहाच्या ट्रॅक पँटची, का ते पाहा Video
| Updated on: May 07, 2023 | 8:54 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 51 वा सामना गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात रंगला. हा सामना गुजरातने 56 धावांनी जिंकला. या सामन्यात लखनऊने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र गुजरातने आक्रमक खेळी करत 20 षटकात 2 गडी गमवून 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात वृद्धिमान साहाची बॅट चांगलीच तळपली त्याने 51 चेंडूत 94 धावांची नाबाद खेळी केली. यात 2 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. पण इतकी चांगली खेळी केली त्याच्या पँटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

विजयासाठी 228 धावांचं आव्हान दिल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी आलेला वृद्धिमान साहा काहीसा प्रेक्षकांना काहीसा वेगळा दिसला. यष्टीरक्षण करताना त्याने पँट उलटी घातल्याचं काही जणांचा लक्षात आलं. मग काय सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. स्पॉन्सरचा लोगो त्याच्या मागच्या बाजूला पाहून सोशल मीडियावर हास्यकल्लोळ रंगला.

एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हंटलं की, साहाने चुकून ट्रॅक पँट उलटी घातली आहे. पुढची बाजू मागे आल्याचं दिसतंय. पण त्याने फलंदाजी करताना काहीच गडबड केली नाही. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, साहा घाई गडबडीत पँट उलटी घालून आला.

दुसरीकडे, गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेलं 228 धावांचं आव्हान लखनऊला काही गाठता आलं नाही. 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा करता आल्या. गुजरातने लखनऊचा 56 धावांनी पराभव केला. कायल मेयर्स आणि क्विंटन डिकॉकने आक्रमक सुरुवात करून दिली खरी पण मधल्या फळीतले फलंदाज अपयशी ठरले.

दोन्ही संघाचे खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी