AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 मध्ये दुखापत, मोठा खेळाडू वनडे वर्ल्ड कपमधून होऊ शकतो बाहेर

IPL 2023 मधल्या दुखापतीचा एका देशाच्या टीमला बसणार फटका. आयपीएलमध्ये खेळाडूंना दुखापती होण्याचा धोका आहे. यंदाच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या दुखापती परवडणाऱ्या नाहीत.

IPL 2023 मध्ये दुखापत, मोठा खेळाडू वनडे वर्ल्ड कपमधून होऊ शकतो बाहेर
ipl
| Updated on: Apr 06, 2023 | 10:17 AM
Share

IPL 2023 News : अनेक चांगले क्रिकेटर्स दुखापतीमुळे IPL 2023 चा सीजन सुरु होण्याआधी आऊट झाले. आता जे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतायत, त्यांना सुद्धा दुखापत होण्याचा धोका आहे. आयपीएल टुर्नामेंट ही क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत लीग आहे. जगभरातील क्रिकेटर्स आयपीएलमध्ये खेळून आपलं कौशल्य दाखवत असतात. यंदाच्या सीजनमध्ये खेळत असताना दुखापत होणारा केन विलियमसन पहिला क्रिकेटर ठरला.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याला दुखापत झाली. ही दुखापत खूपच गंभीर दिसतेय. या दुखापतीमुळे तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाहीय.

त्याला मैदान सोडाव लागलं

आता त्याचं यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण सुद्धा कठीण दिसतय. केन आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायन्स टीमचा भाग होता. फिल्डिंग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो मॅचमध्ये बॅटिंग करु शकला नाही. त्याला मैदान सोडाव लागलं.

त्याचं रिहॅब कराव लागेल

गुडघे दुखापतीमुळे विलियमसन आयपीएल 2023 मधून बाहेर गेलाय. न्यूझीलंडला तो मायदेशी परतलाय. 5 एप्रिलला त्याच्या गुडघ्याच स्कॅन झालं. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रियेनंतर विलियमसनच रिहॅब कराव लागणार आहे. त्यामुळे त्याच्या वर्ल्ड कपपर्यंत फिट होण्याबद्दल सस्पेन्स आहे.

View this post on Instagram

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

3 आठवड्यांच्या आत शस्त्रक्रिया

केन विलयमसनवर पुढच्या 3 आठवड्यात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याच्या रिकव्हरीला थोडा वेळ लागेल. मैदानावर पुनरागमन करण्यासाठी तो आतुर आहे. त्याला मैदानात परतायच आहे. दुखापतीनंतर फॅन्सकडून समर्थन

IPL 2023 दरम्यान दुखापत झाल्यानंतर केन विलियमसनला फॅन्सकडून सपोर्टही मिळाला. क्रिकेट फॅन्स लवकरच तो बरा होईल, अशी अपेक्षा करतायत. विलियमसनने सर्वच फॅन्सचे आभार मानले आहेत. त्याशिवाय गुजरात टायटन्स आणि न्यूझीलंड क्रिकेटचेही आभार मानलेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.