Suyash Sharma | सुयश शर्मा याने गाठली खालची पातळी, व्हीडिओ व्हायरल

राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. मात्र केकेआरला पराभवासह एकट्या जितेश शर्मामुळे आणखी टीकेचा सामना करावा लागतोय.

Suyash Sharma | सुयश शर्मा याने गाठली खालची पातळी, व्हीडिओ व्हायरल
| Updated on: May 12, 2023 | 3:26 AM

पश्चिम बंगाल | आयपीएल 16 व्या मोसमात 56 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. ही मॅच दोन्ही संघांसाठी प्लेऑफ क्वालिफिकेशनच्या हिशोबाने महत्वाची होती. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा होता. मात्र सामना कुणीतरी एकच टीम जिंकणार. पण दोन्ही संघांनी विजयासाठी तेवढाच जोर लावला. मात्र कोलकाताचे प्रयत्न कुठेच पुरे पडले नाहीत. राजस्थानने टॉस जिंकत आधी केकेआरला बॅटिंगसाठी बोलावलं. राजस्थानच्या गोलंदाजांनी केकेआरला 149 धावांवर रोखल्याने 150 धावांचं आव्हान मिळालं.

जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी मैदानात आली. दोघेही या हंगामात धमाकेदार कामगिरी करतायेत. त्यामुळे या सामन्यातही आश्वासक सुरुवात मिळेल, अशी अपेक्षा टीम मॅनेजमेंट आणि क्रिकेट चाहत्यांना होती. तशी सुरुवाही झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वाल याने नितीश राणा याच्या ओव्हरमध्ये 26 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर झालं उलटंच.

दुसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर बटलर रन आऊट झाला, ते ही स्वत:च्या हलगर्जीपणामुळे. बटलर खातंही उघडू शकला नाही. त्यामुळे राजस्थानची 1.4 ओव्हरमध्ये 1 बाद 30 धावा अशी स्थिती झाली. बटलरनंतर मैदानात कॅप्टन संजू सॅमसन आला. या दोघांनी खिंड लढवली. एका बाजूने यशस्वीने फटकेबाजी सुरु ठेवत 13 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलं.

राजस्थानने शेवटपर्यंत सामना एकतर्फी केला. या दोघांनी शतकी भागीदारी केली. त्यानंतर पुढे धमाका सुरुच ठेवला. राजस्थान विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली होती. आता फक्त औपचारिकता बाकी होती. राजस्थानला विजयासाठी 43 बॉलमध्ये फक्त 3 धावांची गरज होती. सुयश शर्मा याने सामन्यातील 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जे काही केलं, ते पाहून प्रत्येकाचं डोकं फिरलं.

सुयश शर्मा याने काय केलं?

विजयासाठी 3 धावा हव्या होत्या. संजू 48 धावांवर स्ट्राईक एंडवर खेळत होता. तर यशस्वी जयस्वाल हा नाबाद 94 धावांसह नॉन स्ट्राईक एंडला होता. जितेश 13 व्या ओव्हरमधील शेवटचा बॉल टाकला. तो टाकण्याआधी जितेशच्या डोक्यात दुसरंच काही सुरु होतं, जे सुरु होतं ते बॉल टाकल्यानंतर सर्वांसमोर आलं.

संजूचं अर्धशतक किंवा यशस्वीचं शतक पूर्ण होऊ नये, यासाठी सुयश वाईड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला नाही, टाकलाच होता. मात्र संजूने लेग साईडच्या बाहेर जात तो बॉल हुक केला.

जितेशच्या या कृतीतून त्याला काय करायचं होतं हे स्पष्ट झालं. सुयशला संजूला अर्धशतक आणि यशस्वीला शतक करण्यापासून रोखायचं होतं, म्हणून त्याने वाईड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यशस्वीने 14 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर यशस्वीने चौकार पेटवला आणि राजस्थानचा 41 बॉलआधी 9 विकेट्सने विजय झाला. मात्र सुयशला या कृतीनंतर सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे.

व्हायरल व्हीडिओ

दरम्यान राजस्थान रॉयल्सने मोठ्या फरकाने विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. राजस्थानने मुंबई इंडियन्सला मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच राजस्थानने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.