AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashasvi Jaiswal Fastest 50 | यशस्वी जयस्वाल याचा झंझावात, 13 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकत ऐतिहासिक कामगिरी

लखनऊ सुपर जायंट्स टीमचा नियमित कर्णधार केएल राहुल याच्यासाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. यशस्वी जयस्वाल याने केएल राहुल याला मोठा झटका दिला आहे.

Yashasvi Jaiswal Fastest 50 | यशस्वी जयस्वाल याचा झंझावात, 13 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकत ऐतिहासिक कामगिरी
| Updated on: May 11, 2023 | 10:28 PM
Share

पश्चिम बंगाल | राजस्थान रॉयल्स टीमचा युवा आणि छावा बॅट्समन यशस्वी जयस्वाल याने पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगने धमाका केलाय. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 150 धावांच्या पाठलाग करायला उतरलेल्या राजस्थानच्या या बॅट्समनने कीर्तीमान रचला आहे. यशस्वीने आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यशस्वीने अवघ्या 13 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आणि केएल राहुल याचा रेकॉर्ड केला आहे. यशस्वीने या 13 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 चौकार ठोकले. याचाच अर्थ असा की यशस्वीने या अर्धशतकातल्या 50 पैकी 46 धावा या खडेखडे केल्या. तर उर्वरित 4 धावा धावून घेतल्या.

केएल राहुल याचा विक्रम मोडीत

यशस्वीने केएल राहुल याला मागे टाकलंय. याआधी वेगवान अर्धशतकाचा विक्रम हा केएल याच्या नावावर होता. केएल याने 8 एप्रिल 2018 रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध हा कारमाना केला होता. तेव्हा केएल पंजाब इलेव्हनकडून खेळायचा. तर आता केएल आता लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. मात्र केएल याला दुखापत झाल्याने तो या 16 व्या मोसमातून बाहेर झाला आहे.

आयपीएल इतिहासातील वेगवान अर्धशतक

विजयासाठी 150 धावांचं आव्हान

दरम्यान केकेआरने राजस्थानला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलंय. राजस्थान कॅप्टन संजू समॅनस याने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानच्या गोलंदाजांनी आपल्या कॅप्टनचा निर्णय अचूक ठरवला. राजस्थानच्या गोलंदाजांनी केकेआरला ठराविक अंतराने झटके देणं सुरुच ठेवलं होतं.  केकेआरच्या फलंदाजांना राजस्थानच्या भेदक माऱ्यासमोर 8 विकेट्स गमावून 20 ओव्हमध्ये 149 धावाच करता आल्या. राजस्थानकडून युझवेंद्र चहल याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. चहलने यासह पर्पल कॅप मिळवली. तसेच चहल ड्वेन ब्राव्हो याचा रेकॉर्ड ब्रेक करत आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅप्टन), रहमानुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.