
मुंबई | विराट कोहली याच्या दमदार शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादवर गुरुवारी 19 मे रोजी विजय मिळवला. विराटच्या या शतकामुळेच आरसीबीचा 8 विकेट्सने विजय झाला. आरसीबीच्या या विजयामुळे मुंबई इंडियन्सला झटका लागला आहे. आरसीबीच्या विजयानंतर मुंबईला आपल्या साखळी फेरीतील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. मात्र यानंतरही मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडेल, कसं ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबईने आयपीएल 16 व्या मोसमात आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई 14 पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 21 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणारा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र यानंतरही आरसीबीचा पराभवच मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचवू शकतो.
तसेच आरसीबी आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकला तर थेट प्लेऑफमध्ये पोहचेल. कारण आरसीबीचा नेट रनरेट चांगला आहे. आरसीबीचा शेवटचा सामना हा गुजरात टायटन्स विरुद्ध 21 मे रोजी खेळणार आहे. त्यामुळे मुंबईचं प्लेऑफमधील भवितव्य हे आरसीबी विरुद्ध जीटी सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे.
मुंबईने आतापर्यंत या मोसमात 13 सामने खेळले आहेत. यापैकी 7 मॅचमध्ये विजय तर 6 सामन्यात पराभव झाला आहे. मुंबईला आपल्या अखरेच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे मुंबईला हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल.
दरम्यान सूर्यकुमार यादव हा या मोसमातील पहिल्या टप्प्यात विशेष प्रभावी ठरला नाही. मात्र त्यानंतर सूर्याला सूर गवसला. सूर्याने आयपीएलमधील पहिलंवहिलं शतक ठोकलं.सूर्या या मोसमात मुंबईसाठी सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज आहे. सूर्याने 13 सामन्यांमध्ये 486 धावा केल्या आहेत. त्यामुळे लीग फेरीतील शेवटच्या सामन्यात पोहचण्यासाठी सूर्याचा धमाका होणं गरजेचं आहे.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.