IPL 2023 : CSK vs RR | राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्ज 3 धावांनी पराभूत

राजस्थानच्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 172 धावा करता आल्या.

IPL 2023 : CSK vs RR | राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्ज 3 धावांनी पराभूत
| Updated on: Apr 12, 2023 | 11:54 PM

मुंबई : आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील थरारक सामन्यामध्ये सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. संदीप शर्माने परफेक्ट यॉर्कमुळे अवघ्या 3 धावांनी राजस्थान संघाने विजय मिळवला. राजस्थानच्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 172 धावा करता आल्या.  सामना एकवेळ पूर्णपणे राजस्थान रॉयल्सच्या हातात होता मात्र धोनी आणि जडेजाने सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटून टाकलं होतं.

24  बॉलमध्ये 59 , 12 बॉलमध्ये 40 शेवटच्या 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज होती. संदीप शर्मा ओव्हर टाकत होता, या युवा गोलंदाजाला आयपीएलचा तसा चांगला अनुभव होतो. मात्र पहिले दोन चेंडू वाईड त्यानंतर दोन सिक्सर आणि तीन सिंगल त्यानंतर रॉयल्सचा अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. माही आज परत एकदा जुन्या फॉर्ममध्ये दिसला. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला.

 

 

 

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग