RCB vs LSG : खतरनाक! IPLमधील फाफ ने मारला सर्वात लांब गगनचुंबी सिक्सर, पाहा Video

डू प्लेसीस याने पंधराव्या ओव्हरमध्ये लखनऊचा बॉलर रवी बिष्णोई याच्या ओव्हरमध्ये यंदाच्या आयपीएल मधील सर्वात लांबलचक गगनचुंबी षटकार मारला आहे.

RCB vs LSG : खतरनाक! IPLमधील फाफ ने मारला सर्वात लांब गगनचुंबी सिक्सर, पाहा Video
| Updated on: Apr 10, 2023 | 10:31 PM

मुंबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स संघाने 20 षटकात 212 धावा केल्या आहेत. आरसीबीने फक्त 2 विकेट गमावत 212 धावांचा डोंगर उभा केलाय. यामध्ये कर्णधार फाफ डू प्लेसिसने  नाबाद 79 धावांची आक्रमक खेळ केली आणि त्याला ग्लेन मॅक्सवेल यानेस चांगली साथ दिली. मॅक्सवेलनेही 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

डू प्लेसीस याने पंधराव्या ओव्हरमध्ये लखनऊचा बॉलर रवी बिष्णोई याच्या ओव्हरमध्ये यंदाच्या आयपीएल मधील सर्वात लांबलचक गगनचुंबी षटकार ठोकला. फाफ ने मारलेला हात ताकदवान 115 मीटरचा सिक्सर थेट चिन्नास्वामी स्टेडिअमच्या बाहेर गेला.

 

लखनऊ संगाने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. चिन्नास्वामी मैदानावर धावांचा रतीब पाहायला मिळतो. त्यामुळेच विराट कोहलीने एक आक्रमक अशी सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती. पहिल्या सहा ओव्हर मध्ये 56 धावा काढल्या होत्या यामध्ये विराटने एक बाजूने आक्रमण करत लखनऊ संघाच्या बॉलरचा त्याने चांगलाच घाम काढला.

विराट कोहली याला अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने तंबूचा मार्ग दाखवला. वैयक्तिक 61 धावांवर कोहली बाद झाला. त्यानंतर आक्रमक  मॅक्सवेल मैदानात आला होता. फाफ आणि मॅक्सवेल यांनी थांबायचं नाव घेतलं नाही दोघांनीही लखनऊच्या बॉलरवर आक्रमण चढवत संघाला 200 धावांचा टप्पा पार करू दिला.

लखनऊ प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.