
मुंबई : आरसीबी आणि लखनऊ यांच्यामधील पार पडलेला सामना अत्यंत रोमांचक झालेला पाहायला मिळाला. सामन्यामध्ये अनेकवेळा पारडं आरसीबीच्या बाजूने तर काही वेळा पारडं हे लखनऊ संघाच्या बाजूने झुकलं. मात्र अंतिम चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊ संघाने थरारक असा विजय मिळवला. हा सामना आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला मात्र क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या सामन्याचा निकाल आरसीबीची बॅटींग झाल्यावरच सांगितला होता.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या सलामीच्या भागीदारीमुळे ग्लेन मॅक्सवेल आणि कंपनीला मोठ्या धावसंख्येसाठी एक उत्तम लॉन्च पॅड मिळाला. मात्र मला वाटत नाही की चिन्नास्वामीमध्ये 210 धावा देखील सुरक्षित नाहीत, असं सचिन तेंडुलकरने आरसीबीची बॅटिंग झाल्यावरच सांगितलं होतं. सचिनने सांगितल्याप्रमाणे आरसीबीला 212 धावा करूनही विजय मिळवता आला नाही.
The opening partnership by @imVkohli and @faf1307 has given the perfect launchpad for @Gmaxi_32 and company to set a big total, but on this surface and ground I have a feeling even 210 may not be safe.#RCBvLSG
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 10, 2023
चिन्नास्वामी स्टेडिअमध्ये याआधीही आरसीबीला अनेकवेळा मोठी धावसंख्या उभारूनही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यामध्ये तर गोलंदाजांनी सुरूवात एकदम झकास केली होती. मात्र त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी केलेल्या घातक फलंदाजीच्या जोरावर लखनऊ संघाने विजय मिळवला.
सुरुवातीच्या तीन विकेट्स लखनऊ संघाने अवघ्या 23 धावांवर गमावल्या होत्या. मात्र स्टॉयनीसने केलेल्या 62 धावांच्या खेळीनंतर मैदानात उतरलेल्या निकोलस पुरनने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत सामना बॉल टू रन इथपर्यंत आणला. 19 चेंडूत 62 धावांच्या खेळीमध्ये पुरनने सात षटकार आणि चार चौकार ठोकले. मोहम्मद सिराजने त्याला कॅच आऊट केलं. त्यानंतर तळाच्या खेळाडूंनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
लखनऊ प्लेइंग इलेव्हन लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.