AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | RCB vc LSG : आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात फास्ट अर्धशतक करणारे खेळाडू, निकोलसनेही मिळवलंय स्थान!

निकोलस पुरन ने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत सामन्यात रंगत आणली. या मॅचमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक मारत भीमपराक्रम केला आहे.

IPL 2023 | RCB vc LSG : आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात फास्ट अर्धशतक करणारे खेळाडू, निकोलसनेही मिळवलंय स्थान!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 10, 2023 | 11:22 PM
Share

बंगळुरू : आरसीबी आणि लखनऊमध्ये सुरू असलेल्या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 202 धावांचा डोंगर उभारला होता. लखनऊ संघ जेव्हा या आव्हानाचा पाटलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांची सुरुवात एकदम निराशाजनक झाली होती. सुरुवातीचे सुरुवातीच्या तीन विकेट्स लखनऊ संघाने अवघ्या 23 धावांवर गमावल्या होत्या. मात्र स्टॉयनीसने केलेल्या 62 धावांच्या खेळीनंतर मैदानात उतरलेल्या निकोलस पुरन ने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत सामन्यात रंगत आणली. या मॅचमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक मारत भीमपराक्रम केला आहे.

आरसीबी आणि लखनऊ मध्ये सुरू असलेल्या मॅचमध्ये वेस्टइंडीजचा आक्रमक खेळाडू निकोलस पूरन याने सर्वात वेगवान अर्धशतक मारलं आहे. पुरन याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूत अर्धशतक केलेल्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 203 धावांचा पाठलाग करताना निकोलस पुरवल्याने आपल्या घातक फलंदाजीच्या जोरावर हा सामना एकतर्फी केला त्यासोबतच यंदाच्या आयपीएल मधील सर्वात वेगवान अर्धशतक मारण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 15 चेंडूंमध्ये पूर्ण करत रेकॉर्ड केला आहे. निकोलसने षटकारांचा पाऊस पाडला, आपल्या 19 चेंडूत 62 धावांच्या खेळीमध्ये त्याने सात षटकार आणि चार चौकार ठोकले. मोहम्मद सिराजने त्याला कॅच आऊट केलं.

आयपीएलच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वात वेगवान अर्धशतक मारण्याचा विक्रम हा राहुलच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 14 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या स्थानी  पॅट कमिन्स आहे. त्यानेही 14 चेंडूतच अर्धशतक केलं होतं. तिसऱ्या स्थानी सुनील नारायण आणि आता निकोलस पुरन याने स्थान मिळवलं आहे.

लखनऊ प्लेइंग इलेव्हन लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान