IPL 2023 | RR vs PBKS : शिखर धवनची कप्तानी खेळी, राजस्थान रॉयल्सला इतक्या धावांचं आव्हान

आयपीएल 2023 स्पर्धेतील आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स सुरु आहे. टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता.

IPL 2023 | RR vs PBKS : शिखर धवनची कप्तानी खेळी, राजस्थान रॉयल्सला इतक्या धावांचं आव्हान
RR vs PBKS IPL 2023 Live Score | राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, कोण मारणार बाजी?
| Updated on: Apr 05, 2023 | 9:50 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स सुरु आहे. टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या राजस्थानला पंजाब संघाने 198 धावांचं आव्हान दिलं आहे. कर्णधार शिखर धवनने नाबाद 86 आणि प्रभसिमरन सिंगच्या वादळी अर्धशतकाच्या (60 धावा) जोरावर पंजाबने हे आव्हान दिलं आहे. प्रभसिमरन सिंगने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. पंजाब 200 धावांचा टप्पा पार करेल असं वाटत होतं मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी 200 धावांच्या आतमध्ये पंजाबला रोखलं.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (W), शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग