Arjun Tendulkar : मुबंई इंडिअन्स संघाला मोठा धक्का, अर्जुन तेंडुलकरला चावलाय कुत्रा, व्हिडीओ आला समोर!

मुंबई इंडिअन्स, चेन्नई सुर किंग्ज हे दोन संघ जागा मिळवतील असं दिसत आहे. मात्र मुंबई इंडिअन्स संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याच्या हाताला कुत्रा चावला आहे.

Arjun Tendulkar : मुबंई इंडिअन्स संघाला मोठा धक्का, अर्जुन तेंडुलकरला चावलाय कुत्रा, व्हिडीओ आला समोर!
| Updated on: May 16, 2023 | 8:11 PM

मुंबई : आयपीएलचं यंदाचं पर्व आता संपत आलेलं असून काही सामन्यानंतर अंतिम 4 संघ कोणते असणार  हे स्पष्ट होणार आहे. गुजरात टायटन्स संघाने आपलं प्ले-ऑफमधील जागा पक्की केली असून आता तीन संघ प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यामध्ये मुंबई इंडिअन्स, चेन्नई सुर किंग्ज हे दोन संघ जागा मिळवतील असं दिसत आहे. मात्र मुंबई इंडिअन्स संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याच्या हाताला कुत्रा चावला आहे.

नेमकं काय झालं? 

मुंबई आणि लखनऊचा सामना आता सुरू आहे. रविवारी अर्जुन तेंडुलकरला लखनऊमध्ये कुत्रा चावला. अर्जुन सराव केल्यानंतर बाहेर एका दुकानात बन मख्खन खायला गेला होता. त्यादरम्यान एका कुत्र्याने त्याच्या हाताचा चावा घेतल्याची माहिती समजत आहे.

लखनऊ संघाचे खेळाडू सामन्याआधी सराव करत होते. त्यावेळी लखनऊचे खेळाडू युद्धवीर सिंग आणि मोहसीन खान यांच्याशी तो बोलत होता. यादरम्यान अर्जुनने कुत्रा चावल्याचं सांगत असून त्यानंतर लखनऊच्या खेळाडूंनी त्याला काळजी घ्यायला सांगितली.

 

अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो या मोसमात एकूण चार सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकूण 13 धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये चार सामन्यांत त्याने 30.67 च्या सरासरीने एकूण तीन बळी घेतले आहेत. या मोसमात कोलकाताविरुद्ध पदार्पण करणाऱ्या अर्जुनने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांची प्लेइंग 11

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल