IPL 2023 : कोट्यवधींची कमाई करणाऱ्या विराट कोहलीला ठोठावलेला दंड कोण भरणार? जाणून घ्या

| Updated on: May 04, 2023 | 10:31 PM

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या आरसीबी संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या पैकी तीन सामन्यात विराट कोहलीने आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. त्याला यासाठी दंड भरावा लागणार आहे.

1 / 7
विराट कोहलीने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 2 प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे 100 टक्के दंड ठोठावला आहे. यासाठी त्याला 1.07 कोटी दंड भरावा लागणार आहे. गौतम गंभीरला 25 लाख, तर  नवीन उल हकला पगाराच्या 50 टक्के रक्कम भरावी लागेल.

2 / 7
विराट कोहलीचा आयपीएल पगार १५ कोटी रुपये आहे आणि प्रत्येक सामन्याची फी सुमारे १.०७ कोटी रुपये आहे. असेल पण विराट कोहली ही रक्कम देणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 7
विराट कोहली आणि गंभीरला दंड ठोठावण्यात आला असला तरी तो आयपीएल संपल्यानंतर भरला जाईल.प्रत्येक संघ आणि खेळाडूवर ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम फ्रँचायसीकडून वसूल केला जाईल.

4 / 7
विराट कोहलीच्या दंडाची रक्कम आरसीबी फ्रँचायझी भरणार आहे. संघ व्यवस्थापन मानधनातून कोणतीही रक्कम कापणार नाही. या नुकसानीचा भार आरसीबी फ्रँचायझी उचलणार असल्याचे वृत्त आहे.

5 / 7
फ्रँचायसी त्यांच्या खेळाडू आणि कर्मचार्‍यांवर लादलेल्या दंडाची रक्कम भरतात. त्यामुळे विराट कोहलीच्या पगारात कोणतीही कपात होणार नसल्याची माहिती आहे.

6 / 7
बीसीसीआय संघ आणि खेळाडूंवर लावलेल्या दंडाचे बिल फ्रँचायझींना पाठवते. त्यानंतर सर्व फ्रँचायसी त्यांचा संघ आणि खेळाडूंकडून दंड वसूल करतात. येथे ही रक्कम खेळाडूच्या पगारातून कापली जावी की नाही हा संबंधित संघाचा अंतर्गत विषय आहे.

7 / 7
किंग कोहलीच्या पगारात कोणतीही कपात होणार नसल्याचे आरसीबीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विराट कोहली दंड भरणार नाही, त्याऐवजी त्याचा खर्च आरसीबी उचलणार आहे.