AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Schedule |17 व्या मोसमासाठी 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात धोनी-विराट भिडणार

IPL 2024 Full Schedule In Marathi | आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या स्पर्धेला केव्हापासून सुरुवात होणार?

IPL 2024 Schedule |17 व्या मोसमासाठी 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात धोनी-विराट भिडणार
| Updated on: Feb 22, 2024 | 6:59 PM
Share

मुंबई | क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं आहे. त्यामुळे यंदा आयपीएल स्पर्धा ही टप्प्यात पार पडणार आहे. त्यानुसार बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे.  पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 21 सामने पार पडतील.

यंदाच्या 17 व्या मोसमातील सलामीचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. अर्थात हा सामना महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली असा होईल. हा सामना 22 मार्च रोजी पार पडेल. पहिला सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे.  तर या पहिल्या टप्प्यातील अखेरचा सामना हा 7 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडेल.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना केव्हा?

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रविवारी 24 मार्च रोजी होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना अहमदाबदमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हार्दिक पंड्या आपल्या होम ग्राउंडमध्ये होम टीम विरुद्ध खेळणार आहे. हार्दिकची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली. तसेच तो मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता हार्दिक आपल्या नेतृत्वात मुंबईला विजयी सुरुवात देणार का, याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2023 नुसार यंदाही 2024 च्या 17 व्या मोसमात एकूण 74 सामने पार पडतील. यंदा गत मोसमाच्या तुलनेत 7 दिवस जास्त थरार रंगणार आहे. 17 वा मोसम एकूण 67 दिवस पार पडेल. लोकसभा निवडणुकांमुळे हा निर्णय घेतला गेला आहे. याआधी 2019 च्या लोकसभा निवडणूकीवेळेसही अशाच पद्धतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हा 2 टप्प्यात आयपीएल स्पर्धा पार पडली होती.

आयपीएल 17 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

चेन्नई आणि मुंबई यशस्वी संघ

दरम्यान चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आयपीएल इतिहासातील यशस्वी संघ आहेत. सीएसके आणि एमआय या दोन्ही संघांनी संयुक्तरित्या 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी टीम होती. मात्र चेन्नईने 2023 आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवत विजेतेपट पटकावलं आणि मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 हंगामात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे. तर चेन्नईने 2010,2011, 2018, 2021 आणि 2023 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

उर्वरित वेळापत्रकाचं काय?

आयपीएल अध्य अरुण धुमल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलेलं की 22 मार्चपासून आयपीएल 17 व्या हंगामाला सुरुवात होईल. तसेच वेळापत्रक हे टप्प्यात प्रसिद्ध केलं जाणार असल्याचंही धुमल यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच उर्वरित वेळापत्रक हे लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकानुसार जाहीर केलं जाणार असल्याचंही धूमल यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता चाहत्यांना उर्वरित वेळापत्रकासाठी लोकसभा निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?