KKR vs RCB : आरसीबीच्या पराभवानंतर कॅप्टन फाफला मोठा फटका, नक्की काय झालं?

IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नक्की काय झालं? जाणून घ्या.

KKR vs RCB : आरसीबीच्या पराभवानंतर कॅप्टन फाफला मोठा फटका, नक्की काय झालं?
virat and faf umpire kkr vs rcb,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 4:16 PM

आयपीएलच्या 17 मोसमात करो या मरो सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा शेवटच्या बॉलवर 1 धावेने पराभव झाला आणि केकेआरने सनसनाटी विजय मिळवला. केकेआरने विजयासाठी दिलेल्या 223 धावांचा पाठलाग करताना आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 221 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीचं या पराभवासह या 17 व्या हंगामातून पॅकअप झालं. आरसीबीच्या पराभवानंतर कॅप्टन म्हणून फाफ डु प्लेसीस याला दुहेरी झटका लागला आहे. फाफसोबत नक्की काय झालंय ते जाणून घेऊयात. बीसीसीआयने फाफवर मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने सामन्यानंतर स्लो ओव्हर रेटमुळे फाफ डु याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच रविवारी 21 एप्रिल रोजी डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात पंजाबला गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला. पंजाबचा कॅप्टन याच्यावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

आरसीबी पिछाडीवर

नियमांनुसार, ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हरचा खेळं होणं अपेक्षित असतं. वेळेत ठराविक षटकांचा खेळ पूर्ण करण्याची जबाबदारी ही फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनची असते. केकेआर विरुद्ध टॉस जिंकून आरसीबीने फिल्डिंगचा निर्णय घेतला. मात्र आरसीबीला निश्चित वेळेत 20 ओव्हर टाकता आल्या नाहीत. केकेआरच्या निर्धारित वेळेत 19 ओव्हर टाकून झाल्या होत्या. त्यामुळे बीसीसीआयने फाफला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. फाफ स्लो ओव्हर रेटमुळे दंडात्मक कारवाई झालेला आठवा कर्णधार ठरला आहे. त्याआधीचे 7 कर्णधार हे भारतीय होते.

अंपायरसह हुज्जत महागात

दरम्यान गुजरात विरुद्धच्या सामन्यात पंजाबचा कॅप्टन सॅम करन याला नाराजी व्यक्त करणं महागात पडलं. सॅम करनला एका सामन्यासाठी मिळणाऱ्या एकूण मानधनाच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सॅमने लेव्हल 1 नियमाच्या 2.8 चं उल्लंघन केल. या नियमात अंपायरच्या निर्णयाविरुद्ध आक्षेप घेतल्यास कारवाईची तरतूद आहे. आपण चुकल्याचं सॅमने मान्य केलं असल्याने त्याच्यावर पुढची कारवाई टळली.

हे सुद्धा वाचा

आरसीबी प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

Non Stop LIVE Update
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.