AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक, दोन नाही तर चार वेळा धडपडली काजोल; व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल!

अभिनेत्री काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती चार विविध ठिकाणी धडपडताना दिसतेय. काजोलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

एक, दोन नाही तर चार वेळा धडपडली काजोल; व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल!
KajolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 10:14 AM

अभिनेत्री काजोल नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. कधी काही फोटो तर कधी आयुष्यातील काही खास क्षण ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. नुकताच तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल धडपडताना दिसत आहे. चार वेगवेगळ्या ठिकाणी ती कशा पद्धतीने धडपडली, याचा एकत्रित व्हिडीओ तिने ‘वर्ल्ड लाफ्टर डे’निमित्त पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानेही काजोलच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

‘स्वत:ला पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की स्टिल कॅमेरासमोर माझं वागणं आश्चर्यकारकरित्या चांगलं राहिलं आहे. थोडं निवांत बसून काही व्हिडीओ पुन्हा एकदा पाहुयात, ज्यांनी लोकांना खूप हसवलं आहे’, असं कॅप्शन देत काजोलने तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यातील पहिल्या क्लिपमध्ये काजोल सहजच चालताना पाय घसरून पडल्याचं दिसत आहे. तिच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक आणि इतर काही लोकं आहेत. तर दुसऱ्या क्लिपमध्ये ती चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्टेजवरच धडपडते. यावेळी तिच्या बाजूला उभा असलेला अभिनेता वरुण धवन तिला सावरतो. तिसरी क्लिप ही ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आहे. शाहरुखसोबत काजोल सायकल चालवत असते आणि अचानक ती सायकलवरून खाली पडते. चौथा व्हिडीओ हा दुर्गा पूजादरम्यानचा आहे. मंडपात स्टेजवरून खाली उतरताना काजोल तिच्या फोनमध्ये पाहत असते, तेव्हाच ती धडपडते.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलच्या या व्हिडीओवर कमेंट करत मनिष मल्होत्राने लिहिलं, ‘मला अजूनही आठवतंय, जेव्हा मॉरिशसमध्ये तू पडली होती आणि आम्ही सर्वजण तुझ्या दिशेने धावून आलो होतो. तू काही क्षणांसाठी नि:शब्द आणि स्तब्ध झाली होती आणि नंतर आम्ही सर्वजण खूप हसलो. कुछ कुछ होता है या चित्रपटाच्या अशा अनेक आठवणी आहेत. तुला खूप सारं प्रेम.’ काजोलच्या या धडपडणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वैष्णवीचं बाळ इतके दिवस कुठे होतं? बाळाला सांभाळणारं पवळे कुटुंब कोण?
वैष्णवीचं बाळ इतके दिवस कुठे होतं? बाळाला सांभाळणारं पवळे कुटुंब कोण?.
Vaishnavi Hagawane प्रकरणात दादांचं पहिल्यादाच भाष्य, बघा काय म्हणाले
Vaishnavi Hagawane प्रकरणात दादांचं पहिल्यादाच भाष्य, बघा काय म्हणाले.
हा हुंडाबळीच, वैष्णवी मला एकच म्हणाली.. मामानं जे सांगितल ते धक्कादायक
हा हुंडाबळीच, वैष्णवी मला एकच म्हणाली.. मामानं जे सांगितल ते धक्कादायक.
मोठी बातमी... हगवणे यांची NCPतून हकालपट्टी, सुनेच्या मृत्यूला कारणीभूत
मोठी बातमी... हगवणे यांची NCPतून हकालपट्टी, सुनेच्या मृत्यूला कारणीभूत.
मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं, कुठे कसा होणार पाऊस? IMD चा इशारा काय?
मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं, कुठे कसा होणार पाऊस? IMD चा इशारा काय?.
वर्षभरात लव्ह मॅरेजचा अंत, मुख्यध्यापिकेकडून पतीची हत्या, कारण काय?
वर्षभरात लव्ह मॅरेजचा अंत, मुख्यध्यापिकेकडून पतीची हत्या, कारण काय?.
पाकची हेर 3 वेळा मुंबईला, गर्दीच्या ठिकाणी वावर अन् लालबागचा राजा...
पाकची हेर 3 वेळा मुंबईला, गर्दीच्या ठिकाणी वावर अन् लालबागचा राजा....
शासकीय विश्रामगृहात मोठं घबाड, माजी आमदाराचा खळबळजनक आरोप नेमका काय?
शासकीय विश्रामगृहात मोठं घबाड, माजी आमदाराचा खळबळजनक आरोप नेमका काय?.
भुजबळांचा शपथविधी अन् रात्री मुंडेंना घेऊन दादा थेट फडणवीसांच्या घरी
भुजबळांचा शपथविधी अन् रात्री मुंडेंना घेऊन दादा थेट फडणवीसांच्या घरी.
पुण्याच्या वैष्णवीची हत्या की हुंडाबळी? बघा AtoZ कहानी, नेमकं घडल काय?
पुण्याच्या वैष्णवीची हत्या की हुंडाबळी? बघा AtoZ कहानी, नेमकं घडल काय?.