
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध टॉस जिंकला. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन याने वानखेडे स्टेडियममध्ये पहिले बॉलिंगचा निर्णय घेत मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. राजस्थान आणि मुंबई दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे. राजस्थानने वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याला दुखापत झाल्याने त्याच्या जागी नांद्रे बर्गर याला संधी देण्यात आली आहे. मात्र हार्दिकने घेतलेला निर्णय पलटणच्या चाहत्यांना काही पटलेला नाही.
मुंबईच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केलाय. हार्दिकने आकाश मढवाल याला संधी दिली आहे. तर मुंबईचा लोकल बॉय शम्स मुलानी याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शम्स मुलानी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळतो. त्याला वानखेडे स्टेडियमबाबत प्रत्येक कानाकोपरा माहित आहे. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धा मुंबईने जिंकली होती. मुंबईला फायनलपर्यंत पोहचवण्यात शम्सने बॅटिंग आणि बॉलिंगने अष्टपैलू भूमिका बजावली होती. त्यामुळे शम्सला संधी द्यायला हवी होती, पण तसं झालं नाही.
शम्स मुलानीने या 17 व्या हंगामातूनच आयपीएल पदार्पण केलं. शम्स मुंबईसाठी पहिल्या 2 सामन्यात गुजरात आणि हैदराबाद विरुद्ध खेळला. मात्र त्याला आपली छाप सोडता आली नाही. शम्सने बॅटिंगमध्ये 1 डावात फक्त 1 धाव केली. तर बॉलिंग करताना 2 डावात एकही विकेट घेता आली नाही. याच कारणामुळे शम्स मुलानी याचा राजस्थान विरुद्धच्या सामन्यातून पत्ता कट करण्याचा निर्णय कॅप्टन हार्दिक आणि टीम मॅनेजमेंटने घेतला.
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह आणि क्वेना मफाका.
राजस्थान रॉयल्स प्लेईंग ईलेव्हन : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल.