IPL 2024, CSK vs LSG : ऋतुराज गायकवाडची कॅप्टन इनिंग, लखनौ सुपर जायंट्ससमोर 211 धावांचं आव्हान

आयपीएल 2024 स्पर्धेतील 39वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या.

IPL 2024, CSK vs LSG : ऋतुराज गायकवाडची कॅप्टन इनिंग, लखनौ सुपर जायंट्ससमोर 211 धावांचं आव्हान
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 23, 2024 | 9:20 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील टॉप 4 मधील स्थान मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेकीचा कौल जिंकला. केएल राहुलने दुसऱ्या डावात दव फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि टीमला सर्वाधिक धावसंख्या करायला हव्या याची कल्पना होती. त्यामुळे कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्वत: मोर्चा सांभाळला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर संघावर दडपण आलं. पण कर्णधार ऋतुराज गायकवाडने मोर्चा सांभाळला. सुरुवातील डेरिल मिचेल आणि नंतर रवींद्र जडेजासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यासह चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून  210 धावा केल्या आणि विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं. आता ही धावसंख्या गाठण्याचं मोठं आव्हान लखनौ सुपर जायंट्ससमोर आहे.

अजिंक्य रहाणे या सामन्यातही काही खास करू शकला नाही. 3 चेंडूंचा सामना करत 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर डेरिल मिचेल आणि रवींद्र जडेजाही काही खास करू शकले नाहीत. पण ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेने चांगली फलंदाजी केली. ऋतुराज गायकडने शतक तर शिवम दुबेने अर्धशतक ठोकलं. यामुळे लखनौ सुपर जायंट्सचे गोलंदाज पुरते हैराण दिसले. दोघांनी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या. यात 12 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर शिवम दुबेने 27 चेंडूत 66 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 7 षटकार मारले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.