
चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 49 व्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. चेन्नईकडून कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक धावा केल्या. ऋतुराजने 62 धावांचं योगदान दिलं. तर अजिंक्य रहाणे आणि समीर रिझवी या दोघांनी 29 आणि 21 धावा जोडल्या. तर पंजाब किंग्सकडून हरप्रीत ब्रार याने 2 विकेट्स घेतल्या.
ऋतुराजचा अपवाद वगळता पंजाबच्या बॉलिंगसमोर चेन्नईचे फलंदाज निष्प्रभ ठरले. चेन्नईच्या दोघाचा अपवाद वगळता फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करण्याआधीच पंजाबच्या गोलंदाजांनी त्यांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र ऋतुराजने केलेल्या 62 धावांमुळे चेन्नईला 150 पार मजल मारता आली. ऋतुराजने 48 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 62 धावा केल्या. तर ओपनर अजिंक्य रहाणे याने 24 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. शिवम दुबे आला तसाच गेला. ऑलराउंडर रवींद्र जडेजा 2 रन करुन माघारी परतला.
समीर रिझवी याने 23 बॉलमध्ये 21 धावांच योगदान दिलं. मोईन अली याने 15 धाला जोडल्या. महेंद्रसिंह धोनी याने 166.67 च्या स्ट्राईक रेटने 9 बॉलमध्ये 15 धावा केल्या. तर डॅरेल मिचेल 1 रनवर नॉट आऊट परतला. पंजाबकडून राहुल चहार याने 2 विकेट्स घेतल्या.कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंह या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
चेन्नईचे गोलंदाज 163 धावांचा बचाव करणार का?
Innings Break!#CSK put up a competitive 162/7 courtesy of skipper’s fifty and former skipper’s finishing touches 🎯
Will #PBKS chase it down? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/EOUzgkMFN8 #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/XzkDv8TWGy
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2024
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन आणि मुस्तफिजुर रहमान.