AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या अंडर 19 संघात फसवणुकीचा प्रकार! अनुभवी खेळाडूने सत्य मांडत केला खुलासा

पाकिस्तानने नुकतंच अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं जेतेपद मिळवलं. अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. पण आता या संघाबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानच्या अंडर 19 संघात फसवणुकीचा प्रकार! अनुभवी खेळाडूने सत्य मांडत केला खुलासा
पाकिस्तानच्या अंडर 19 संघात फसवणुकीचा प्रकार, अनुभवी खेळाडूने सत्य मांडत केला खुलासाImage Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Dec 25, 2025 | 4:33 PM
Share

पाकिस्तान संघ आणि वाद हे काय आता नवीन राहिलं नाही. त्यात पाकिस्तानकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाण्यासारखं आहे. पाकिस्तान देशात रक्तातच खोटेपणा भिनलेला आहे. याची प्रचिती अनेकदा आली आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्येही फसवणुकीचा प्रकार काही नवीन नाही. वय कमी दाखवून पाकिस्तान संघात खेळण्याचा प्रकार सर्वश्रूत आहे. याबाबत अनेकदा आरोप प्रत्यारोप होत असतात. पण आता एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपूटने याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे. 19 वर्षाखालील संघातील खेळाडू 17 किंवा 18 वर्षांचे असल्याचा दावा करतात, पण ते त्यापेक्षा मोठे असल्याचं धक्कादायक वास्तव माजी क्रिकेटपटूने उघड केलं आहे. पाकिस्तानने नुकताच अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धा जिंकली. त्यामुळे पुन्हा एकदा संशयाचं वारं घोंघावताना दिसत आहे. संघात खेळलेले खेळाडू खरंच 19 वर्षांखालील होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

माजी क्रिकेटपटू मोहम्मद आसिफने पाकिस्तानमधील अंडर 19 क्रिकेटचं वास्तव जगासमोर मांडलं आहे. त्याने हे वास्तव उघड करताना माजी कर्णदार शाहिद आफ्रिदीवरही दोषी असल्याचा आरोप केला आहे. एका मुलाखतीत अंडर 19 संघाबाबत बोलताना आसिफ म्हणाला की, ‘कागदावर पाकिस्तानी खेळाडू फक्त 17 आणि 18 वर्षांचे दिसतात. पण ते 27 ते 28 वर्षांचे असतात. शाहिद आफ्रिदी हा उत्तर उदाहरण आहे.’ माजी पाकिस्तानी अष्टपैलू आफ्रिदी त्याच्या वयामुळे अनेकदा टीकेचा धनी ठरला आहे. त्याचं वय कमी असल्याचं सांगत अनेक जण त्याची खिल्ली उडवतात. 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शाहीद आफ्रिदी आता 48 वर्षांचा आहे, हे वास्तव आहे.

भारत अफगाणिस्तानतही वयाची गडबड

क्रिकेटमध्ये वय कमी दाखवून खेळण्याचा प्रकार फक्त पाकिस्तानतच नाही तर दक्षिण आशिया देशात असंच चित्र आहे. भारतातही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यात वय कमी दाखवल्याचा आरोप केला गेला आहे. अफगाणिस्तान संघात तर खोटं वय दाखवून अनेक खेळाडू अंडर 19 संघात खेळतात. श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही असंच चित्र आहे. त्यामुळे क्रिकेट बोर्ड आता त्याची गंभीर दखल घेताना दिसत आहेत.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी