CSK vs RCB Toss : आरसीबीने पहिल्या सामन्यात टॉस जिंकला, चेन्नईला मोठा झटका

| Updated on: Mar 22, 2024 | 8:37 PM

IPL 2024 CSK vs RCB Toss | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

CSK vs RCB Toss : आरसीबीने पहिल्या सामन्यात टॉस जिंकला, चेन्नईला मोठा झटका
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद हे ऋतुराज गायकवाड याच्याकडे आहे. तर फाफ डु प्लेसीस हा आरसीबीचा कॅप्टन आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 40 मिनिटांनी टॉस पार पडला. नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला. आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्संच्या टीममध्ये एकूण 4 परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये मूळ भारतीय वंशाचा रचीन रवींद्र, डॅरेल मिचेल, मुस्तफिजुर रहमान आणि महेश तीक्षना या चौघांचा समावेश आहे. तसेच दुखापतीमुळे सीएसकेचा ओपनर डेव्हॉन कॉनव्हे याला सलामीच्या सामन्यातून मुकावं लागलं आहे. त्यामुळे रचीन रवींद्र हा सीएसकेसाठी ओपनिंग करणार आहे. तसेच समीर रिझवी याचं या हंगामातील सलामीच्या सामन्यातून आयपीएल पदार्पण केलं आहे.

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

दरम्यान आयपीएलच्या गेल्या 16 मोसमांमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघ एकूण 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये सीएसकेचा वरचष्मा राहिला आहे. सीएसकेने एकूण 31 पैकी 20 सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

आरसीबीने टॉस जिंकला

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश तीक्षना, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर आणि मोहम्मद सिराज.