IPL 2024, DC vs GT : दिल्ली गुजरातमध्ये प्लेऑफसाठी चुरशीची लढत, या खेळाडूंवर असेल मदार

| Updated on: Apr 23, 2024 | 2:39 PM

आयपीएल स्पर्धा आता प्लेऑफसाठी रंगतदार वळण घेताना दिसत आहे. प्रत्येक संघ आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. चला जाणून घेउयात या सामन्यात कोणते खेळाडू बेस्ट ठरतील ते

IPL 2024, DC vs GT : दिल्ली गुजरातमध्ये प्लेऑफसाठी चुरशीची लढत, या खेळाडूंवर असेल मदार
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमधील स्थान मिळवण्यासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 8 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर गुजरात टायटन्सने एकूण 8 सामने खेळले असून 4 सामन्यात विजय, तर 4 सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानातील खेळपट्टी ही संथ असल्याची यापूर्वी गणना होत होती. मात्र वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ही खेळपट्टी बदलण्यात आली आहे. तसेच या खेळपट्टीवर फलंदाजांना बऱ्यापैकी मदत होते. वेगवान गोलंदाजांना काही अंशी मदत होईल. तर फिरकीपटूना चेंडू वळण्यासाठी पूरक आहे. खेळपट्टी स्लो असल्याने फलंदाजांना काही ठिकाणी अडचण येईल. पण ऑउटफिल्ड एकदम फास्ट असल्याने फलंदाजांना मदत होईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकला की प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

दिल्ली कॅपिटल्सचे सात आणि गुजरात टायटन्सच्या 4 खेळाडूंवर या सामन्याची मदार असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद यांचा समावेश असेल. तर गुजरात टायटन्सकडून शुबमन गिल, साई सुदर्शन, मोहित शर्मा, राशीद खान यांचा समावेश असेल. आता हे खेळाडू ठरलेल्या दिवशी कशी कामगिरी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या स्पर्धेत दुसऱ्यांदा भिडणार आहे. यापूर्वीच्या सामन्यात दिल्लीने गुजरात टायटन्सला 17.3 षटकात फक्त 89 धावांवर सर्वबाद केलं होतं. तसेच दिलेलं आव्हान 4 गडी गमवून 8.5 षटकात पूर्ण केलं होतं. या निकालामुळे गुजरात टायटन्सच्या नेट रनरेटवर जबर फटका बसला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग 11: डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/ विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, पृथ्वी शॉ.

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11: ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, साई किशोर, रशीद खान, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा, साई सुदर्शन.