IPL 2024 : मुंबईकर ऑलराउंडरची अखेरच्या क्षणी निवड, मेहनतीचं फळ मिळालंच

Tanush Kotian And B R Sharath | आयपीएलच्या 17 व्या मोसमाच्या काही तासांआधी आणखी एका मुंबईकर खेळाडूची एन्ट्री झाली आहे. मुंबईकडून आयपीएल खेळणारा हा 12 वा खेळाडू ठरणार आहे.

IPL 2024 : मुंबईकर ऑलराउंडरची अखेरच्या क्षणी निवड, मेहनतीचं फळ मिळालंच
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 3:52 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या 17 व्या हंगामाची सुरुवात ही रंगारंग कार्यक्रमाने होणार आहे. ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर करण्यात आला आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सलामीच्या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाड याचा कर्णधार म्हणून हा पहिल्याच सामना असणार आहे. महेंद्रसिंह धोनी याने पदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋतुराजला ही संधी मिळाली. तर फाफ डु प्लेसिस याच्याकडे आरसीबीचं नेतृत्व असणार आहे.

2 खेळाडू, 2 संघ आणि 2 बदल

या सलामीच्या सामन्याआधी 2 संघांमध्ये बदल करण्यात आले आहेत. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 बदल केला आहे. गुजरात टायटन्सने रॉबिन मिन्झच्या जागी बीआर शरथचा संघात समावेश केला आहे. तर मुंबईकर तनुष कोटीयन ॲडम झंपाच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला आहे.

बी आर शरथ याच्याबाबत थोडक्यात

बी आर शरथ हा विकेटकीपर बॅट्समन आहे. बी आर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक टीमसाठी खेळतो. शरथने 20 फर्स्ट क्लास आणि 43 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तसेच 28 टी सामन्यांमध्येही शरथने प्रतिनिधित्व केलंय. बीआर शरथला गुजरात टायटन्सने त्याच्या 20 लाख या बेस प्राईजमध्ये आपल्या गोटात घेतलं आहे.

तनुष कोटीयनची आयपीएलमध्ये एन्ट्री

मुंबईने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी विदर्भावर मात करत 42 व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. मुंबईच्या विजयात ऑलराउंडर तनुष कोटीयन याने मोठी भूमिका बजावली. तनुषने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या मोसमात एकूण 502 धावा केल्या. तनुष कोटीयन याने एकमेव शतक हे बडोदा विरुद्ध 10 व्या स्थानी बॅटिंग करताना झळकावलं. तसेच तनुषने 10 सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या. तनुषच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

17 व्या हंगामासाठी दोघांचा समावेश

तनुषला राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलंय. तनुषने मुंबईचं 23 टी-20, 26 फर्स्ट क्लास आणि 19 लिस्ट ए सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. तनुषने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 24, 75 आणि 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 62, 1152 आणि 90 अशा धावा केल्या आहेत. आता तनुष आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे मुंबईकर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.