MUM vs BAR | तुषार देशपांडे-तनुष कोटीयन जोडीचा धमाका, बडोदा विरुद्ध 10 विकेटसाठी विक्रमी भागीदारी

Tanush Kotian and Tushar Deshpande | तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे या दोघांनी इतिहास बदलला आहे. या दोघांनी दहाव्या विकेटसाठी चक्क 232 धावांची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी केली आहे.

MUM vs BAR | तुषार देशपांडे-तनुष कोटीयन जोडीचा धमाका, बडोदा विरुद्ध 10 विकेटसाठी विक्रमी भागीदारी
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 12:20 PM

मुंबई | मुंबईच्या तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे या दोघांनी बडोदा विरुद्ध रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात इतिहास रचला. तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे या दोघांनी दहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करत वैयक्तिक शतकं ठोकली. तनुष आणि तुषार या दोघांचं हे पहिलंवहिलं प्रथम श्रेणी शतक ठरलं. दोघांनी तुफानी बॅटिंग करत बडोदा टीमच्या गोलंदाजांची पिसं काढली. या दोघांनी दहाव्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी केली. तनुष आणि तुषारने या भागीदारीसह अनेक रेकॉर्ड उध्वस्त केले.

शम्स मुलानीच्या रुपात मुंबईने नववी विकेट गमावली. शम्सने 54 धावा केल्या. शम्स आऊट झाल्याने मुंबईची 9 बाद 337 अशी स्थिती झाली. त्यानंतर तुषार देशपांडे आणि तनुष कोटीयन या दोघांनी दाणादाण उडवून दिली. तनुष आणि तुषारच्या आक्रमक बॅटिंगसमोर बडोद्याचे गोलंदाज हैराण झाले. या दोघांनी दांडपट्टा सुरु ठेवत चाबूक बॅटिंग सुरु ठेवली. बडोद्याला अखेर ही जोडी फोडण्यात यश आलं.

हे सुद्धा वाचा

मुंबईकडून पहिल्या डावात द्विशतक ठोकलेल्या मुशीर खान याच्यानंतर तनुश, तुषार आणि हार्दिक तामोरे या दोघांनी शतकी खेळी केली. मुंबईकडून तुषार देशपांडे याने सर्वाधिक 123 धावांची खेळी केली. तुषारने 129 बॉलमध्ये 10 चौकार आणि 8 सिक्सच्या मदतीने ही खेळी केली. तनुष कोटीयन याने 129 बॉलमध्ये 10 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने नाबाद 120 धावा केल्या. हार्दिक तामोरे याने 114 रन्स केल्या. तर पृथ्वी शॉ याने 87 आणि शम्स मुलानीने 54 धावांचं योगदान दिलं. दरम्यान तनुष आणि तुषारने केलेल्या विक्रमी भागीदारीमुळे आता बडोदाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी 606 धावा कराव्या लागणार आहेत.

तनुष कोटीयन-तुषार देशपांडेचा धमाका

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार),भुपेन ललवाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, मुशीर खान, पृथ्वी शॉ, शम्स मुलानी, शार्दुल ठाकुर, सूर्यांश शेडगे, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे.

बडोदा प्लेईंग ईलेव्हन | विष्णू सोलंकी (कॅप्टन) भार्गव भट्ट, जे के सिंह, एस आय मेरीवाला, महेश पिठीया, मितेश पटेल (विकेटकीपर), एन ए रथवा, प्रियांशू मुलिया, राज लिंबानी, शाश्वत रावत आणि शिवालिक शर्मा.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.