Musheer Khan | मुशीर खान याचा डबल धमाका, बडोदा विरुद्ध धमाकेदार द्विशतक
Mushir Khan Double Century | मुशीर खान याने मुंबई अडचणीत असताना बडोद्याच्या गोलंदाजावर टिच्चू मारा करत एक बाजू लावून धरली. मुशीरने संयमीपणे द्विशतक पूर्ण केलं.

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात रांचीत दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. तिथे सरफराज खान टीम इंडियासाठी आपला दुसरा कसोटी सामान खेळतोय. तर इथे मुंबईत त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान याने इतिहास रचला आहे. मुशीर खान बीकेसीतल शरद पवार क्रिकेट अकादमी स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलमध्ये बडोदा विरुद्ध खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. मुशीरने या द्विशतकी खेळीसह मुंबईला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.
मुशीरने 350 बॉलमध्ये हे द्विशतक पूर्ण केलं. मुशीरच्या या द्विशतकी खेळीत 18 चौकारांचा समावेश होता. मुशीरने 57 च्या स्ट्राईक रेटने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिलंवहिलं द्विशतक झळकावलं. मुशीरने त्याआधी पहिल्याच दिवशी शतक झळकावलं होतं. मुशीरने 179 बॉलमध्ये 6 चौकारांसह शतक पूर्ण केलं होतं. मुशीरने या चिवट द्विशतकी खेळीसह बडोद्याला पूर्णपणे डॉमिनेट केलं. मुशीरने त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाची सुरुवात केली. मुशीरने दुसऱ्या दिवशी 264 बॉलमध्ये 12 चौकारांचसह 150 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर आता मुशीरने 350 बॉलमध्ये 18 फोरसह द्विशतक पूर्ण केलं.
मुशीरने डाव सावरला
दरम्यान मुंबईची पहिल्या दिवशी 5 बाद 142 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर मुशीर आणि हार्दिक तामोरे या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. मुशीर आणि हार्दिक या दोघांनी मुंबईकडून सहाव्या विकेटसाठी चिवट आणि झुंजार भागीदारी केली. या दोघांनी तब्बल 444 बॉलमध्ये 181 धावांची भागीदारी केली. हार्दिकने या दरम्यान अर्धशतक झळकावलं. मात्र त्यानंतर हार्दिक 7 धावा करुन आऊट झाला. हार्दिकने 248 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या.
हार्दिकनंतर शार्दूल ठाकुरही झटपट आऊट झाला. त्याने 7 धावा केल्या. मुशीरनंतर आलेल्या तनुष कोटीयन याच्यासोबत मुंबईचा डावा पुढे नेला. मुशीरने या दरम्यान द्विशतक पूर्ण केलं. मुशीरचं या द्विशतकी खेळीनंतर सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.
मुशीरची झुंजार द्विशतकी खेळी
मुशीर खानची रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलमध्ये बडोदा विरुद्ध द्विशकी खेळी#MusheerKhan #DoubleCentury #MUMMvsBAR #RanjiTrophy #Mumbai #म #मराठी #क्रिकेट pic.twitter.com/o8KeZ2TeB8
— Sanjay Patil (@patil23697) February 24, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार),भुपेन ललवाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, मुशीर खान, पृथ्वी शॉ, शम्स मुलानी, शार्दुल ठाकुर, सूर्यांश शेडगे, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे.
बडोदा प्लेईंग ईलेव्हन | विष्णू सोलंकी (कॅप्टन) भार्गव भट्ट, जे के सिंह, एस आय मेरीवाला, महेश पिठीया, मितेश पटेल (विकेटकीपर), एन ए रथवा, प्रियांशू मुलिया, राज लिंबानी, शाश्वत रावत आणि शिवालिक शर्मा.
