Musheer Khan | 4,4,4,4,4,4, मुशीर खान याची ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी, मुंबईसाठी चिवट शतक

Musheer Khan Century | सरफराज खान याचा भाऊ आणि क्रिकेटर मुशीर खान याने खणखणीत शतक झळकावत फर्स्ट क्लास कामगिरी केली आहे.

Musheer Khan | 4,4,4,4,4,4, मुशीर खान याची 'फर्स्ट क्लास' कामगिरी, मुंबईसाठी चिवट शतक
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 4:51 PM

मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या मुंबईकर मुशीर खान याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये बडोदा विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं आहे. मुंबईतील बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमीत सुरु असलेल्या सामन्यात मुंबईची आश्वासक सुरुवात झाली. मात्र त्यानंतर मुंबईने झटपट विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर मुशीर खान आणि हार्दिक तामोरे या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. मुशीरने या दरम्यान शतक पूर्ण केलं.

मुशीर खान याच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. मुशीरने 179 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. मुशीरच्या या शतकी खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. मुशीरच्या या खेळीमुळे मुंबईचा डाव सावरला. मुशीरला या दरम्यान हार्दिक तामोरेने चांगली साथ दिली. मुशीरच्या या शतकी खेळीमुळे त्याच्याकडून आता आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. तसेच मुशीरचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईची बॅटिंग

कॅप्टन अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवाणी सलामी जोडीने 57 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पृथ्वी 33 धावांवर आऊट झाला. त्यानंतर भुपेन 19, रहाणे 3, शम्स मुलानी 6 आणि सूर्यांश शेंडगे 20 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे मुंबईची स्थिती 5 बाद 142 झाली. मात्र त्यानंतर मुशीर आणि हार्दिक तामोरे या दोघांनी चिवट खेळी केली. या दोघांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 106 धावांची नाबाद भागीदारी केली.’

मुशीरची झुंजार खेळी

मुंबईने पहिल्या दिवासाचा खेळसंपेपर्यंत 90 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 248 धावा केल्या. मुशीर खान 216 बॉलमध्ये नाबाद 128 धावा करुन परतला. तर हार्दिक तामोरे याने 163 बॉलमध्ये नाबाद 30 धावा केल्या. बडोदाकडून भार्गव भट याने 4 विकेट्स घेतल्या. तर निनाद रत्वाला 1 विकेट मिळाली.

बडोदा प्लेईंग ईलेव्हन | विष्णू सोलंकी (कॅप्टन) भार्गव भट्ट, जे के सिंह, एस आय मेरीवाला, महेश पिठीया, मितेश पटेल (विकेटकीपर), एन ए रथवा, प्रियांशू मुलिया, राज लिंबानी, शाश्वत रावत आणि शिवालिक शर्मा.

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार),भुपेन ललवाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, मुशीर खान, पृथ्वी शॉ, शम्स मुलानी, शार्दुल ठाकुर, सूर्यांश शेडगे, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे.

Non Stop LIVE Update
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन.
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे.
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका.
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी.
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?.