AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : गॅस सिलिंडरची आज काय स्थिती, जाणून घ्या महाराष्ट्रातील अपडेट्स

| Updated on: Mar 14, 2026 | 10:08 AM
Share

Maharashtra News LIVE Updates : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतात तीव्रतेने जाणवू लागले आहेत. घरगुती गॅसचं मुख्य संकट निर्माण झालं आहे. युद्धासह देशातील महाराष्ट्रातील अन्य महत्वाच्या राजकीय, क्रीडा, सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra News LIVE : गॅस सिलिंडरची आज काय स्थिती, जाणून घ्या महाराष्ट्रातील अपडेट्स
Breaking news

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Mar 2026 10:30 AM (IST)

    राज्याचे एमएमआर क्षेत्रात स्वतंत्र पार्किंग धोरण

    एम एम आर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे सध्या सुमारे ११,९३१ पार्किंग लॉट्स नियोजन करण्यात आले आहे. दोन मोठे ट्रक टर्मिनस प्रस्तावित असून 70 ठिकाणी पार्किंग आरक्षण राज्य शासन लवकरच मंजुरी देणार असल्याचे सांगत …एम एम आर क्षेत्रातील स्वतंत्र पार्किंग पॉलीसी तयार करण्याच्या निर्णय शासनाने घेतलेला आहे..

  • 14 Mar 2026 10:20 AM (IST)

    ठाणे महानगरपालिका करणार नव्याने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण..

    महापालिकेकडे या सर्वेक्षणासाठी आवश्यक यंत्रणा नसल्यामुळे हे काम ठेकेदारा मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे… फेरीवाल्यांचे नव्याने बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी तसेच त्यांची नोंदणी ओळखपत्र आणि प्रमाणपत्र तयार करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.. 49.50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या कामासाठी ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे…

  • 14 Mar 2026 10:05 AM (IST)

    ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

    शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक थेट 269 वर पोहोचला आहे. विविध विकास कामामुळे आणि धूळ, धुरांच्या व्यक्तीने शहरात वायु प्रदूषणाचे पातळी प्रचंड वाढली. ठाणे शहराचा जगातील अति प्रदूषित शहरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे…

  • 14 Mar 2026 09:58 AM (IST)

    LPG Shortage : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

    बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅस वापरला जात आहे. जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून 19 पथकं नियुक्त करून हॉटेलवर छापेमारी करत थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र बीड जिल्हा रुग्णालयाची कॅन्टीन चालवणाऱ्या चालकाकडून घरगुती गॅसचा वापर केला जात आहे. या संदर्भात पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

  • 14 Mar 2026 09:51 AM (IST)

    LPG Shortage : धाराशिव मध्ये काय स्थिती?

    धाराशिव मध्ये मुबलक गॅस पुरवठा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच गॅस साठी लोक रांगेत उभे आहेत.

  • 14 Mar 2026 09:42 AM (IST)

    LPG Shortage : फोर्ट परिसरात छोट्या दुकानदारांनी पेटवली चूल

    मुंबईतील फोर्ट परिसरात छोट्या दुकानदारांनी पेटवली चूल. फोर्ट परिसरात 90 टक्के हॉटेल्स आणि टपरी चालकांकडे गॅसचा पुरवठा बंद. अनेकांनी कोळश्याच्या शेगडीवर सुरू ठेवलाय व्यवसाय. जेवणाचे हाल झाले. गॅस नाही त्यामुळे ऊपासमारीची वेळ आली अशी दुकानदारांची प्रतिक्रिया.

  • 14 Mar 2026 09:22 AM (IST)

    LPG Shortage : ठाणे सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी काय पावलं उचललीत?

    ठाणे सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील गॅस एजन्सींवर लक्ष ठेवण्यासाठी शिधावाटप विभागाकडून 72 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. काळाबाजार आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.निरीक्षकांकडून दररोज एजन्सींना भेट देऊन सिलिंडरचा साठा आणि विक्रीची पाहणी केली आणार आहे.

  • 14 Mar 2026 09:07 AM (IST)

    LPG Shortage : मुक्ताईनगर ग्रामीण भागात काय स्थिती?

    गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांना मुक्ताईनगर ग्रामीण भागातही फटका. हॉटेलचा किराणा आणला तरीही गॅसचं भेटत नाही तर किराणा आणून काय फायदा?. इराण अमेरिका युद्धाचा थेट परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवत आहे. हे युद्ध मोदी सरकारने मध्यस्थी करून थांबवावं अशी देखील मागणी हॉटेल व्यवसायिकाकडून केली जात आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या व्यवसायावर परिणाम झाला असून ग्राहक देखील कमी झालेंत.

  • 14 Mar 2026 09:05 AM (IST)

    LPG Shortage : सोलापुरातील सुप्रसिद्ध सुधा हॉटेलने नोटीस बोर्डवर काय लिहिलं?

    सोलापुरातील सुप्रसिद्ध सुधा हॉटेल बाहेर नोटीस बोर्ड लावत ग्राहकांना आवाहन. ‘इडली सोबत केवळ चटणी मिळेल, सांबर संपले आहे’, अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले. सोलापुरातील हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने बोर्ड लावण्याची वेळ. इडली चटणी सोबत सांबार ही आमची खासियत आहे. मात्र गॅस संपल्यामुळे आम्ही इडली चटणीसोबत सांबर देऊ शकत नाही. आमच्या ग्राहकांना इडली चटणी सोबत सांबर लागते. त्यामुळे सांबर संपले आहे असा बोर्ड लावण्याची वेळ आमच्यावर आली.

  • 14 Mar 2026 09:04 AM (IST)

    LPG Shortage : मुंबईत खाऊ गल्लीत खवय्यांचे प्रचंड हाल

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर खाऊ गल्लीत खवय्यांचे प्रचंड हाल. दुकानदारांकडे कमर्शियल गॅसचा पुरवठाच नसल्याने अखेर काल त्यांना इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण बनवण्याची आली वेळ. सरकार मुर्ख बनवतेय. आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीये अशी खंत दुकानदार व्यक्त करत आहेत. गॅस नाही त्यामुळे गावी जातोय अशीही प्रतिक्रिया दुकानदार देत आहेत.

  • 14 Mar 2026 09:02 AM (IST)

    LPG Shortage : जळगावात सिलेंडर तुटवड्यावर काय मार्ग शोधला?

    जळगावात गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने म्हशीच्या तसेच गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या गवऱ्यांची देखील विक्री वाढली आहे. हॉटेल व्यवसायिक व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने चुलीकडे वळले असून चूल पेटवण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी शेणाच्या गवऱ्यांचा वापर केला जात आहे. अनेकांनी चुलीचा पर्याय वापरायला सुरुवात केल्याने लाकडांबरोबरच म्हशीच्या तसेच गायीच्या शेणाच्या गवऱ्यांची देखील विक्री वाढली आहे.

  • 14 Mar 2026 09:01 AM (IST)

    LPG Shortage : इगतपुरी शहरात काय स्थिती?

    इगतपुरी शहरात व्यासायिक सिलेंडरचा तुटवडा कायम. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी सुरू केले चुलीवर जेवण तर इतर हॉटेल व्यवसायिक चुली तयार करत आहेत. अनेक हॉटेल व्यवसायिकांनी मेनू मध्ये कपात केली. मात्र चुलीवरचे जेवण परवडत नसल्याने काही दिवस हॉटेल बंद करण्याचा घेतला निर्णय. अगोदरच इगतपुरीतील हॉटेल झालीत बंद.

  • 14 Mar 2026 08:59 AM (IST)

    LPG Shortage : वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

    वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड. शिधावाटप विभागाची मोठी कारवाई. निमेश जैनवर गुन्हा दाखल. टेम्पो मालक फरार. मुंबईच्या वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा शिधावाटप विभागाने पर्दाफाश केला आहे. वरळी नाका येथील ‘सूरजी वल्लभदास चाळ’ परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.

मध्य पूर्वेत इराण-इस्रायल-अमेरिकेत सुरु असलेल्या युद्धाचे आता भारतात सर्वसामान्यांना परिणाम जाणवू लागले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केल्याने परिणामी कच्चं तेल आणि LPG ची या समुद्री मार्गावरुन होणारी वाहतूक जवळपास बंद आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज इराणच्या ताब्यात आहे. भारतात अजून पेट्रोल-डिझेलची समस्या निर्माण झालेली नाही. पण एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गॅस वितरकाच्या ऑफिसबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे. एलपीजी संपला तर काय हा लोकांसमोर प्रश्न आहे. लोक तासनतास गॅससाठी रांगते उभे आहेत. हॉटेल व्यावसायिकांची सुद्धा तीच स्थिती आहे. काही खाद्य पदार्थ हॉटेलच्या मेन्यूमधून गायब झालेत, तर काही हॉटेल्सच बंद आहेत. एलपीजीच्या कमतरतेमुळे जी स्थिती निर्माण झालीय, त्याचे सर्व अपडेट्स आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Published On - Mar 14,2026 8:58 AM

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.