AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCB : PSL लाथाडून IPL मध्ये खेळणार हा खेळाडू, पाकिस्तानाला झोंबल्या मिरच्या !

PCB vs Blessing Muzarbani : झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीने पाकिस्तान सुपर लीग मध्ये न खेळात IPLमध्ये खेलणार आहे. पण यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड चांगलाच खवळला आहे.

PCB : PSL लाथाडून IPL मध्ये खेळणार हा खेळाडू, पाकिस्तानाला झोंबल्या मिरच्या !
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराजImage Credit source: PTI/GETTY
| Updated on: Mar 14, 2026 | 10:14 AM
Share

PCB vs Blessing Muzarbani : पाकिस्तान सुपर लीगचा 11 वा सीझन येत्या 26 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीने पाकिस्तान सुपर लीग सोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुझारबानीच्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगलंच खवळलं असून त्यांनी त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदी देखील येऊ शकते.

मुजारबानीवर PCB करणार कारवाई

PSL च्या इस्लामाबाद युनायटेडने मुझारबानीला शमार जोसेफच्या जागी करारबद्ध केले होते. सुरुवातीला तो पीएसएल 2026 मध्ये तीन वेळा विजेत्या ठरलेल्या इस्लामाबाद युनायटेडकडून खेळणार होता. मात्र, 2026 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये त्याने जी प्रभाव कामगिरी केली, त्याने कामगिरीने परिस्थिती बदलली. मुझारबानीने 6 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार विकेट्सचा समावेश होता. यामुळे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने त्याला आयपीएलसाठी करारबद्ध केले.

केकेआरने जानेवारीमध्ये बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमानला रिलीज केले आणि त्याच्या जागी मुझारबानीला घेतले. मुझारबानीने देखील पीएसएलचा करार मागे ठेवून आयपीएलचा पर्याय निवडला, पण त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB नाराज आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, आता पीसीबी मुझारबानीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी असा प्रकार घडला आहे. गेल्या हंगामात कॉर्बिन बॉशने मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यासाठी पीएसएल सोडली होती, त्यानंतर पीएसएलने त्याच्यावर एका हंगामासाठी बंदी घातली होती. वृत्तानुसार, मुझारबानीवरही एका वर्षासाठी पीएसएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात येईल.

ब्लेसिंग मुजरबानीचं दमदार करिअर

ब्लेसिंग मुझारबानी हा झिम्बाब्वेच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 106 विकेट्स घेतल्या आहेत. तो सलग दुसऱ्या हंगामात आयपीएलमध्ये खेळणार आहे. गेल्या हंगामात तो चॅम्पियन ठरलेल्या आरसीबीच्या संघात होता, मात्र तिथे त्याला पदार्पण करत खेळण्याची संधी मिळाली नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल