AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम एक तर दहशतवादी नाहीतर, गँगस्टर…, का भडकल्या स्वरा भास्करच्या आई?

अभिनेत्री स्वरा भास्करची आई आणि माजी जेएनयू प्राध्यापक इरा भास्कर यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.. 'मुस्लीम एक तर दहशतवादी नाहीतर, गँगस्टर...', असं वक्तव्य करत का भडकल्या इरा भास्कर जाणून घ्या...

मुस्लीम एक तर दहशतवादी नाहीतर, गँगस्टर..., का भडकल्या स्वरा भास्करच्या आई?
अभिनेत्री स्वरा भास्कर
| Updated on: Mar 14, 2026 | 10:19 AM
Share

अभिनेत्री स्वरा भास्करची आई आणि सिनेमा अभ्यासक इरा भास्कर यांनी नुकताच समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील राजकारणावरील चर्चेदरम्यान आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ सिनेमावर टीका केली. एवढंच नाही तर, इरा भास्कर यांनी आदित्य धर यांच्या विचारसरणीवरही स्वतः मत व्यक्त केलं आणि सांगितले की. त्याची विचारसरणी नेहमीच हिंदुत्वाबद्दल राहिली आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत ‘धुरंधर’ सिनेमा मुस्लीम आणि पाकिस्तानी नागरिकांना हिंसक दाखवल्यामुळे टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.

इरा भास्कर म्हणाल्या, ‘मी तुम्हाला धुरंधर सिनेमाचं एक उदाहरण देते. जो सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. सर्वात ताजं उदाहरण म्हणजे सिनेमा बक्कळ कमाई करत आहे… हा एक असा सिनेमा आहे, ज्याचं दिग्दर्शन आदित्य धर याने केलं आहे. जे हिंदुत्व आणि हिंदुत्व विचारसरणीवर अधिक विश्वास ठेवतात…

‘धुरंधर’ सिनेमात मुस्लिमांना अधिक हिंसक दाखवलं आहे. यावर इरा भास्कर म्हणाल्या, ‘हे प्रचंड हिंसक आहे… तेथील हिंसाचार अशा विचारसरणीला प्रोत्साहन देतो की, मुस्लिम खूप हिंसक लोक आहेत. पाकिस्तान हा एक अतिशय हिंसक देश आहे. तुम्हाला तिथे सामान्य मुस्लिम दिसत नाहीत. प्रत्येकजण एकतर दहशतवादी किंवा गँगस्टर आहे.’

सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे असं सांगण्यात आलं होतं. यावर इरा भास्कर म्हणाल्या, ‘हा एक काल्पनिक सिनेमा आहे… जो कथितरित्या सत्य घटनांवर आधारित आहे… गोष्टी निवडकपणे निवडेल ज्या एका विशिष्ट विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र असे सिनेमे तयार केले जातात.

‘धुरंधर’ सिनेमानंतर आता ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ‘धुरंधर 2’ बद्दल अनेक चर्चांनी आता जोर धरला आहे. आता प्रत्येक जण फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. सिनेमा प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे, त्याच प्रमाणे सिनेमाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे…

‘धुरंधर 2’ सिनेमात दिग्दर्शक आदित्य धर याची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम देखील दिसणार आहे. सिनेमात यामी कॅमियो करताना दिसणार आह … पण यामी व्यतिरिक्त, निर्माते सिनेमात आणखी एक खास कॅमिओ करण्याची योजना आखत आहेत, असं देखील रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

Follow Us
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्.
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.