AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

370 रुपयांची बिर्याणी पडली महागात, प्रणित मोरे आणि सेजल पवार यांची तब्बल 8 तास चौकशी, पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं होणार!

मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, तर 370 रुपयांची बिर्याणी पडली महागात... प्रणित मोरे आणि सेजल पवार यांची तब्बल 8 तास चौकशी... महाराष्ट्र सायबर सेलची मोठी कारवाई... पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं होणार!

370 रुपयांची बिर्याणी पडली महागात, प्रणित मोरे आणि सेजल पवार यांची तब्बल 8 तास चौकशी, पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं होणार!
Pranit More and Sejal Pawar
| Updated on: Jun 19, 2026 | 9:20 AM
Share

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणी दिवसागणिक वाढतच आहेत. यापूर्वी देखील प्रणित अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पण कोणतंच प्रकरण इतक्या टोकाला पोहचलं नाही. पण प्रणित याला मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, तर 370 रुपयांची बिर्याणी महागात पडली आहे… याप्रकरणी प्रणित मोरे आणि एमबीबीएसची विद्यार्थीनी सेजल पवार बुधवारी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर झाले. जेथे दोघांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहीती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणित आणि सेजल यांची महाराष्ट्र सायबर सेलने तब्बल 8 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. तपास पथकांनी दोघांना पुढच्या आठवड्यात पुन्हा उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी करण्यात येणार आहे.

सेजल आणि प्रणित यांची चौकशी…

सायबर सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान प्रणित मोरे याने सांगितल्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा त्याच्या कॉमेडी शो एक भाग होता आणि तो सुमारे तीन महिन्यांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आला होता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान मोरेने वारंवार माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली; त्याचप्रमाणे, हे प्रकरण इतकं गंभीर वळण घेईल याची आपल्याला कल्पना नव्हती, असेही प्रणित याने संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

अनेक व्हिडीओ जब्त

चौकशी दरम्यान, सायबर अधिकाऱ्यांनी प्रणित मोके याचा मोबाईल ताब्यात घेतला आणि वेगवेगळ्या कॉमेडी शोचे व्हिडीओ जप्त केले आहे… ज्यामुळे तपास करायला अधिक अडचणी येणार नाहीत. तर दुसरीकडे, चौकशीदरम्यान सेजल पवार हिने देखील कबूल केलं की, त्या कार्यक्रमात वापरलेली भाषा अयोग्य होती. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी या संपूर्ण घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आणि जे काही घडलं त्याबद्दल आपल्याला अत्यंत लाज वाटत असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र सायबर सेलने सेजल पवार हिच्या मोबाईल फोनमधील डेटाही मिळवला असून, फॉरेन्सिक तपासासाठी तो सुरक्षित ठेवला आहे. तपास सुरू असून डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात काय होतं पाहणं महत्त्वातं ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?