AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Shortage: रिक्षा प्रवास महागला! गॅस दरवाढीने चालक हैराण, प्रवाशांना भाडेवाढीचा मार

Auto Rickshaw Fair Hike: सध्या जनतेला गॅस तुटवड्याचे चटके सहन करावे लागत आहे. त्यातच रिक्षा चालक गॅस दरवाढीने हैराण झाले आहेत. त्यांनी आता रिक्षा भाडेवाढ केल्याने सामान्यांना पुन्हा एकदा फटका बसला आहे.प्रवाशांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे.

LPG Shortage: रिक्षा प्रवास महागला! गॅस दरवाढीने चालक हैराण, प्रवाशांना भाडेवाढीचा मार
Auto Rickshaw Fair HikeImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 14, 2026 | 8:29 AM
Share

Auto Rickshaw Fair Hike: सध्या राज्यात अभूतपूर्व अशी एलपीजी सिलेंडर कोंडी झाली आहे. सरकार सिलेंडर असल्याचा दावा करत आहे. तर गॅस एजन्सीसमोरील गर्दी हटायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. भल्या पहाटे पाच वाजेपासून लोक सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. ऑनलाईन गॅस बुकिंग होत नसल्याने चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे रिक्षा चालकांनाही गॅस दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. दरवाढीने भाडेवाढ झाल्याने सर्वसामान्यांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे. महागाईचे चटके सर्वसामान्य नागरिकांना सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे.

55 रुपये गॅस भाव आता 90 रुपये किलोवर

जळगावातील इच्छा देवी चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.जळगाव शहरात एलपीजी गॅसचे एकूण तीन पंप असून दोघांवरील गॅस संपल्याने एकच गॅस पंप सध्या स्थितीत सुरू आहे. एकाच पंपावर गॅस शिल्लक असल्याने रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. तब्बल दोन ते तीन तास रांगेत थांबून गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांचा नंबर लागत असल्याचा पाहायला मिळत आहे.

एकीकडे गॅसचा तुटवडा तर दुसरीकडे एलपीजी गॅस मध्ये अचानक झालेली वाढ यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सुरुवातीला 55 रुपये गॅसचा किलोमागे भाव होता मात्र आता अचानक 90 रुपये किलो एवढा भाव झाल्याने रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडला आहे. रिक्षात भरण्याच्या एलपीजी गॅस मध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली असून रिक्षा चालवणे परवडत नसल्याचे म्हटले आहे.

व्यावसायिक सिलेंडरची मागणी

इगतपुरी शहरात व्यासायिक सिलेंडरचा तुटवडा कायम आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेलव्यवसायिकांनी चुलीवर जेवण तयार करायला सुरुवात केली आहे. तर इतर हॉटेल व्यवसायिक चुली तयार करत आहेत. अनेक हॉटेल व्यवसायिकांनी मेनू मध्ये कपात केली आहे. मात्र चुलीवरचे जेवण परवडत नसल्याने काही दिवस हॉटेल बंद करण्याचा निर्णय काही जणांनी घेतला आहे. अगोदरच इगतपुरीतील काही हॉटेल बंद झाली आहेत.

ई-रिक्षा, बाईकसाठी परवाना बंधनकारक

राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परवाना देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित केली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई – बाईकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार