AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder : गॅसची टंचाई आणि थेट सिलेंडरची धाडसी चोरी, चोरट्याने हॉस्पिटलच्या स्वयंपाकगृहातून गॅस टाकीच पळवली

LPG Cylinder Stolen: गॅस सिलेंडरसाठी सध्या नागरिकांच्या एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा दिसून येत आहे. कुणाच्या घरी गॅस संपल्याने तर कुणाचा गॅस संपत आल्याने नागरीक अगोदरच तजवजी करून ठेवत आहेत. पण बुलडाण्यात एकाने तर कहर केला आहे. थेट हॉस्पिटलच्या स्वयंपाकगृहातून सिलेंडर चोरला आहे.

LPG Cylinder : गॅसची टंचाई आणि थेट सिलेंडरची धाडसी चोरी, चोरट्याने हॉस्पिटलच्या स्वयंपाकगृहातून गॅस टाकीच पळवली
थेट गॅस चोरीलाImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 14, 2026 | 9:59 AM
Share

LPG Cylinder Stolen in Buldana: देशभरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने हाहाकार उडाला आहे. पहाटे पाच वाजेपासून नागरिक एका सिलेंडरसाठी एजन्सीबाहेर रांगेत उभे आहेत. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. एका सिलेंडरसाठी इतकी कसरत सुरू असताना आता घरगुती गॅस सिलेंडर सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापराच्या तक्रारी समोर येत आहे. अनेक ठिकाणी छापेमारीत गॅस टाक्या हस्तगत करण्यात येत आहे. या धामधुमीत एका चोरट्याने तर कहर केला आहे. त्याने बुलडाणा येथील रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहातून गॅस सिलेंडर पळवला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गॅस सिलेंडरच पळवाल

बुलडाणा शहरातील क्षय आरोग्यधाम(टीबी रुग्णालय) येतील स्वयंपाकगृहातून भरलेला गॅस सिलेंडर चोरीला गेला आहे. सोबतच काही साहित्यही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी स्वयंपाकगृहाचा दरवाजा तोडून चोरी केली. या ठिकाणी 17 सिलेंडर होते. त्यातील एक सिलेंडर त्याने चोरला. त्याने इतर साहित्याचीही येथून चोरी केल्याचे समोर येत आहे. या चोरच्या घटनेची राज्यात चर्चा सुरू आहे. तर काही रुग्णालयांतील कॅँटिन मालक घटनेने अलर्ट झाले आहे. रात्रीच्यावेळी आता जागरण करावे काय असा सवालही विचारला जात आहे.

कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा आरोप

धाराशिवमध्ये मुबलक गॅस पुरवठा असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच गॅस साठी लोक रांगेत उभा आहेत. गॅस वितरण करणारे कर्मचारी ओळखीच्या लोकांना हेराफेरी करून गॅस पुरवठा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दुसरीकडे तासनतास रांगेत ताटकळत राहावं लागत असल्याने नागरिक संतप्त आहेत.

तर सलग तिसऱ्या दिवशी गॅस एजन्सी बाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस एजन्सी सुरू होण्याअगोदरच सकाळी सात वाजेपासून लोकांनी गॅस साठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. गॅस वितरणाचं योग्य नियोजन नसल्यानेच गॅस मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. एकीकडे मुबलक गॅस पुरवठा असल्याचा प्रशासन सांगत असताना या गोंधळाच्या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तर सरकारकडून गॅस टंचाई, तुटवडा नसून प्राधान्याने ग्राहकांना त्याचा पुरवठा केल्या जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले