
आयपीएल 2024 चा आता शेवटचा टप्पा येत आहे. आयपीएल प्लेऑफच्या रेसमधून मुंबई इंडियन्स बाहेर पडले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रोमहर्षक ठरला. या सामन्यात जॅक फ्रेजर मॅकगर्कने पुन्हा एकदा आपल्या तुफानी फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकाच षटकात 28 धावा केल्या. 22 वर्षीय मॅकगर्कने आवेश खान या गोलंदाजाची जोरदार धुलाई केली. त्याने फक्त आवेश खानला नाही तर इतर गोलंदाजांनाही सोडले नाही. जॅक फ्रेजर यांना 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आता तो एकाच सत्रात 20 पेक्षा कमी चेंडूत 3 अर्धशतकं ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
आयपीएल 2024 मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. दिल्लीसाठी हा ‘करा किंवा मरा’ असा सामना होता. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज असणाऱ्या जॅक फ्रेजर याने दिल्लीसाठी धमाकेदार सुरुवात करुन दिली. नाणेफेक हारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी यावे लागले.
Now this is how you play T20 cricket 💥#DCvRR #TATAIPL #IPLonJioCinema #JakeFraserMcGurk #IPLinHindi pic.twitter.com/wJxxvhKdLe
— JioCinema (@JioCinema) May 7, 2024
दिल्लीने 20 षटकांत 8 गडी गमावून 221 धावा केल्या. यामध्ये सर्वात महत्त्वाची कामगिरी जॅक फ्रेझर मॅकगर्क याची होती. त्याने 19 चेंडूत 50 धावा केल्या. आवेश खान याची चांगली धुलाई केली. मॅकगर्कने डावाच्या चौथ्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर चौकार मारले. यानंतर त्याने पुढच्या तीन चेंडूंवर एक षटकार, एक चौकार आणि नंतर एक षटकार ठोकला. अशाप्रकारे, आवेश खानच्या या षटकात त्याने अनुक्रमे 4, 4, 4, 6, 4, 6 धावा केल्या.
22 वर्षीय जॅक फ्रेझर मॅकगर्क याने आयपीएल 2024 मध्ये 7 सामन्यांमध्ये 235 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 309 धावा केल्या आहेत. परंतु त्यांच्या कामगिरीवर अजूनही ऑस्ट्रेलियन निवड समितीचा विश्वास नाही. त्याला टी20 वर्ल्डकपमध्ये संघात घेतले नाही. मॅकगर्कने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक केल्यानंतर न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले की, मॅकगर्क याची विश्वचषक संघात निवड का झाली नाही हे मला समजले नाही.