
आयपीएल स्पर्धेतील 21 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सला धावांनी पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजूने लागला. यावेळी कर्णधार केएल राहुल याने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फलंदाजी घेतली. मैदान खूपच मोठं असल्याने फलंदाजांना कसरत करावी लागणार याचा अंदाज होता. अखेर झालंही तसंच, गुजरातच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करताना विकेट्स गमावल्या. आघाडीची फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे धावा आणि चेंडूतील अंतर वाढत गेलं. त्यामुळे विजय लांबला. अखेर लखनौ सामन्यावर मजबूत पकड मिळवली आणि सामना ताब्यात घेतला. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही गुजरात टायटन्सला गाठता आलं नाही. गुजरातचा संघ 130 धावा करू शकला.
गुजरातकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सावध सुरुवात करूनदिली. 6 षटकात 54 धावांची भागीदारी केली. मात्र कृणाल पांड्याने साई सुदर्शनला बाद केलं आणि विकेट्सची लाईन लागली. शुबमन गिल 19, केन विल्यमसन 1, शरथ बीआर 2, विजय शंकर 17, दर्शन नलकांडे 12 आणि राशीद खान 0 धावा करून बाद झाला. यश ठाकुरने 5 गडी बाद केले. तर कृणाल पांड्याने 3 गडी आणि रवि बिष्णोईला 1 गडी बाद करण्यात यश आलं.
लखनौ सुपर जायंट्सकडून मार्कस स्टोईनिसने 43 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तर केएल राहुने 33, तर निकोलस पूरनने नाबाद 32 धावा केल्या. आयुष बदोनीने 11 चेंडूत 20 धावा केल्या. उमेश यादव आणि दर्शन नळकांडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर राशीद खानला एक गडी बाद करण्यात यश आलं.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव.