AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, यादीत कोण-कोण?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तेजस्वी घोसाळकर आणि नील सोमय्या यांच्यासह १२५ उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यात आले आहेत.

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, यादीत कोण-कोण?
bjp devendra fadnavis
| Updated on: Dec 29, 2025 | 7:43 AM
Share

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने आपली रणनीती स्पष्ट करत उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या पहिल्या यादीत १२५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

मध्यरात्रीपासून भाजप कार्यालयात लगबग

दादर येथील भाजपचे कार्यालय वसंत स्मृती येथे रविवारी रात्री १ वाजेपासूनच इच्छुक उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्या जागांवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे, अशा जागांच्या उमेदवारांना तातडीने बोलावून पहाटेपर्यंत फॉर्मचे वाटप करण्यात आले.

पहिला AB फॉर्म कोणाला?

मुंबई भाजपच्या वतीने पहिला AB फॉर्म तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आला आहे. त्या वॉर्ड क्रमांक २ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासोबतच अर्चना भालेराव यांच्यासह सुमारे १० ते १५ उमेदवारांनी पहाटेपर्यंत एबी फॉर्म देण्यात आले. भाजपने यावेळी अनुभवी माजी नगरसेवकांसोबतच नव्या दमाच्या युवा नेत्यांवर विश्वास दाखवला आहे.

कोणाकोणाला उमेदवारी?

  • नील सोमय्या: मुलुंड पश्चिम (वॉर्ड क्रमांक १०७) मधून निवडणूक लढवणार.
  • तेजिंदर सिंग तिवाना: वॉर्ड क्रमांक ४७ मधून रिंगणात.
  • शिवानंद शेट्टी: माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक ९ मधून पुन्हा संधी.
  • नवनाथ बन: प्रभाग क्रमांक १३५ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी

दरम्यान या निवडणुकीत भाजपने मिशन १५० चे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईवर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपकडून सर्व ताकद पणाला लावली आहे. विशेषतः प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पक्षात काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. तरी विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आल्याचे माहिती समोर येत आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुंबईच्या राजकीय मैदानात नेमकी कोणती उलथापालथ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?