
कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्सवर 98 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. लखनऊचा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. केकेआरने लखनऊसमोर विजयासाठी 236 धावांचं आव्हान ठेवलं होतं. लखनऊला धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. कोलकाताच्या गोलंदाजांनी लखनऊला 16.1 ओव्हरमध्ये 137 धावांवर गुंडाळलं. केकेआरचा हा आठवा विजय ठरला. तर लखनऊला मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने नेट रनरेटमध्येही मोठा फटका बसला.
लखनऊकडून मार्क्स स्टोयनिस याने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. कॅप्टन केएल राहुल याने 25 धावांचं योगदान दिलं. एश्टन टर्नर 16, आयुष बदोनी 15 आणि निकोलस पूरन याने 10 धावा जोडल्या. लखनऊच्या 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर नवीन उल हक एकटा नाबाद राहिला. केकेआरकडून हर्षित राणा आणि वरुन चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर आंद्रे रसेल याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सुनील नरीन आणि मिचेल स्टार्क या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दरम्यान त्याआधी लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. केकेआरकडून सुनील नरीन याने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. तर फिलीप सॉल्ट आणि अंगकृष रघुवंशी या दोघांनी 32-32 धावा केल्या.तर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि रमनदीप सिंह या दोघांनी 23 आणि 25*धावांचं योगदान दिलं. तर इतरांनाही छोटेखानी पण महत्तवपूर्ण योगदान दिलं. केकेआरडकडून नवीन उल हक याने 3 विकेट्स घेतल्या. तर यश ठाकुर, रवी बिश्नोई आणि युद्धवीर सिंग या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
केकेआरची विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप
High-Fives in the @KKRiders camp 🙌
With that they move to the 🔝 of the Points Table with 16 points 💜
Scorecard ▶️ https://t.co/CgxfC5H2pD#TATAIPL | #LSGvKKR pic.twitter.com/0dUMJLasNQ
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, एश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन उल हक, मोहसिन खान आणि यश ठाकूर.