IPL 2024 | मुंबई इंडियन्सला मोठा झटका, सूर्यकुमार यादव आयपीएलमधून आऊट?

| Updated on: Mar 19, 2024 | 7:49 PM

Suryakumar Yadav IPL 2024 | मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट चाहत्यांसाठी 17 व्या मोसमाआधी झटका देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याबाबत मोठी अपडेट आली आहे.

IPL 2024 | मुंबई इंडियन्सला मोठा झटका, सूर्यकुमार यादव आयपीएलमधून आऊट?
Follow us on

मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु झालंय. लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेला 100 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. यंदाच्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यात 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्संच नेतृत्व करणार आहे. त्याआधी मुंबईच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव याने मुंबईला मोठा झटका दिला आहे. दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादव याला आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागू शकतं. इतकंच नाही, तर सूर्याकुमारवर आयपीएलमधून बाहेर पडण्याचा धोका आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव याची बंगळुरुतील एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट पार पडली. मात्र सूर्याला एनसीएकडून हिरवा कंदील मिळाला नाही. क्रिकेटर दुखापतीनंतर एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेच एकेडमीमध्ये दुखापतीतून फिट होण्यासाठी जातात. तिथे खेळाडूंवर तज्ञांकडून देखरेख ठेवली जाते. त्यानंतर त्यांना टेस्ट द्यावी लागते. त्या टेस्टमध्ये पास झाल्यानंतर एनसीए तो खेळाडू फिट असल्याचं जाहीर करते. त्यानुसार सू्र्याची 19 मार्च रोजी टेस्ट होती. मात्र यामध्ये सूर्याला एनसीएकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे सूर्याला 17 व्या हंगामातील काही सामन्यांना मुकावं लागू शकतं.

सूर्याचा 21 मार्चला निकाल

सूर्यकुमारची पुढची चाचणी ही 21 मार्च रोजी होणार आहे. आता या चाचणीनंतरच सूर्या आयपीएल 17 व्या हंगामात खेळू शकणार की नाही, हे स्पष्ट होईल. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. सूर्या मुंबईच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यामध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. सूर्याने तसं अनेकदा करुन दाखवलंय. त्यामुळे सुर्याच्या या चाचणीकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान सूर्याकुमार यादव याच्या घोट्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुखापत झाली गोती. त्यानंतर सुर्यकुमारवर जर्मनीत शस्त्रक्रिया पार पडली. आता 21 मार्चच्या निकालाकडे सर्वांच लक्ष आहे.

सूर्यकुमार यादव याच्या चाहत्यांना मोठा झटका

सूर्यकुमार यादव याची क्रिकेट कारकीर्द

सूर्याने टीम इंडियाचं 1 कसोटी, 37 एकदिवसीय आणि 60 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. सूर्याने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 8, 773 आणि 2 हजार 141 धावा केल्या आहेत. तसेच सूर्यकुमार यादव याने 2012 साली आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध पदार्पण केलं. सूर्याने तेव्हापासून ते 16 व्या हंगामापर्यंत एकूण 139 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 51 अर्धशतकांसह 2 हजार 267 धावा केल्या आहेत.