MI vs SRH Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात कडवी झुंज, दोघांपैकी वरचढ कोण?

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Head to Head Record : मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सोमवारी 6 मे रोजी सामना होणार आहे. दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.

MI vs SRH Head to Head : मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात कडवी झुंज, दोघांपैकी वरचढ कोण?
srh vs mi pat cummins and hardik pandya,
| Updated on: May 05, 2024 | 11:55 PM

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात भिडणार आहेत. हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबईचे प्लेऑफचे रस्ते बंद झाले आहेत. तर हैदराबादचा हा सामना जिंकून प्लेऑफच्या जवळ पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. मुंबई या हंगामातील 11 सामन्यातून 3 वेळा विजय मिळवला आहे. तर हैदराबादने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. मुंबई आणि हैदराबाद दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.

मुंबई आणि हैदराबाद हे दोन्ही संघ याआधी या 17 व्या मोसमातील 8 व्या सामन्यात आमनेसामने होते. हैदराबादने तेव्हा 31 धावांनी विजय मिळवला होता. हैदराबादने मुंबईसमोर 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने जोरदार प्रतिकार केला. मात्र मुंबईला 246 धावांपर्यंतच मजल मारण्यात यश आलं. त्यामुळे आता मुंबई या पराभवाचा वचपा घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर हैदराबाद पुन्हा विजय मिळवण्याच्या तयारीत असणार आहे. दरम्यान या सामन्याआधी आपण उभयसंघांची आकडेवारी जाणून घेऊयात.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 22 सामने झाले आहेत. या 22 पैकी 12 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर हैदराबादने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबई आकड्यांच्या हिशोबाने सरस आहे. आता 6 मे रोजीच्या सामन्यात कोण बाजी मारतं, याकडे लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.