IPL 2024, PBKS vs GT : गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा वचपा काढला, साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात 3 गडी राखून विजय

| Updated on: Apr 21, 2024 | 11:15 PM

आयपीएल 2023 स्पर्धेतील 37 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पंजाबचा संघ 20 षटकात सर्व गडी बाद 142 धावा केल्या आणि विजयासाठी 143 धावा दिल्या. हे आव्हान गुजरातने 7 गडी गमवून पूर्ण केलं.

IPL 2024, PBKS vs GT : गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा वचपा काढला, साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात 3 गडी राखून विजय
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरातला पराभूत केलं होतं. आता गुजरातने पंजाब हा हिशेब चुकता केला आहे. खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला जातो. पण सॅम करनने प्रथम फलंदाजी घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. इतकंच काय तर शुबमन गिलही नाणेफेकीनंतर मनासारखा निर्णय झाल्याचं म्हणाला होता. पंजाब किंग्सला मोठी धावसंख्या उभारण्याची आवश्यकता होती. पण पंजाब किंग्सचा संघ 20 षटकात सर्व गडी बाद 142 धावा करू शकला. तसेच विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं. गुजरातला मिळालेलं सोप आव्हन सहज शक्य होतं. गुजरातने हे आव्हान 7 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयामुळे गुजरात टायटन्सला गुणतालिकेत जबर फायदा झाला आहे. गुजरात टायटन्सने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. खरं तर गुजरातने पंजाबने दिलेलं आव्हान कमी षटकात पूर्ण केलं असतं तर गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेता आली असती. मात्र तसं काही झालं नाही आणि नेट रनरेटवर किंचितसा फरक दिसला.

गुजरात टायटन्स

गुजरातला 143 धावांचं सोपं आव्हान मिळालं होतं. त्यामुळे फलंदाजांवर तसं काही दडपण नव्हतं. शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी 9.3 षटकात 66 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वृद्धिमान साहा बाद झाला. 13 धावा करून तंबूत परतला. शुबमन गिलही मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. त्याने 29 चेंडूत 35 धावा केल्या. साई सुदर्शनचा डाव 31 धावांवर, तर डेविड मिलर अवघ्या 4 धावांवर आटोपला. अझमतुनल्ला ओमरझाई काही खास करू शकला नाही 13 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे गुजरात टायटन्सवर दबाव वाढला होता. मात्र राहुल तेवतियाने जबरदस्त फलंदाजी केली. तसेच संघावरील दडपण दूर केलं. धावा कमी आणि चेंडू जास्त अशी स्थिती 19 व्या षटकात आणून ठेवली. 12 चेंडूत 5 धावा आवश्यक असताना शाहरुख खान बाद झाला. पण तिथपर्यंत विजय सोपा झाल होता.

पंजाबचा डाव

पंजाब किंग्सकडून कर्णधार सॅम करन आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्याासठी 52 धावांची भागीदारी केली. पण नंतर संघाच्या 99 धावा असताना 7 गडी तंबूत परतले होते. अवघ्या 47 धावांमध्ये 7 गडी तंबूत परतले. हरप्रीत सिंग आणि हरप्रीत ब्रार यांनी 40 धावांची भागीदारी केली आणि संघाला 140 या धावसंख्येवर पोहोचवलं. हरप्रीत ब्रार बाद झाल्यानंतर उर्वरित दोन फलंदाज काही खास करून शकले नाहीत. अवघ्या 2 धावा करत डाव आटोपला. गुजरातकडून साई किशोरने 4, नूर अहमदने 2, मोहित शर्माने 2 आणि राशीद खानने 1 गडी बाद केला.