IPL 2024, PBKS vs GT : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, सॅम करन फलंदाजी घेत म्हणाला..

आयपीएल 2024 स्पर्धेतील 37वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

IPL 2024, PBKS vs GT : पंजाब किंग्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, सॅम करन फलंदाजी घेत म्हणाला..
| Updated on: Apr 21, 2024 | 7:09 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 37व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ आमनेसामने आहेत. या स्पर्धेत दुसऱ्यांदा हे दोन संघ भिडणार आहे. नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने आतापर्यंत चालत आलेल्या ट्रेंडपेक्षा वेगळा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याने क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलच्या मनासारखं झालं आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. तिसऱ्यांदा आम्ही या खेळपट्टीचा वापर केला आहे. गुजरातच्या गोलंदाजांवर प्रथम दबाव आणण्यासाठी आणि बोर्डवर चांगली धावसंख्या उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो. आम्हाला माहित आहे की आम्ही योग्य योजनेसह खेळलो तर आम्ही जिंकू शकतो. शिखर अजूनही बरा नाही. मागच्या प्लेइंग 11 सह उतरणार आहोत.”

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “नाणेफेक जिंकलो असतो तर मी प्रथम गोलंदाजी केली असती. शेवटच्या सामन्यासारखीच विकेट आहे असे दिसते. प्रत्येक खेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आमच्यात काही अडचणी आल्या आहेत. या सामन्यात ओमरझाई परत आला आहे, बरं नव्हतं. पण आता स्पेन्सरच्या जागी आला आहे. जर आम्ही त्यांना 170 च्या आसपास त्यांना रोखू शकलो तर आम्हाला आनंद होईल.”

यापूर्वी 4 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला पराभूत केलं होतं. अगदी हातातून गेलेला सामना जिंकून आणला होता. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत तेव्हाही गोलंदाजी स्वीकारली होती. तसेच गुजरातने 20 षटकात 4 गडी गमवून 199 धावा केल्या आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. पंजाब किंग्सने 19.5 षटकात 7 गडी गमवून 200 धावा केल्या. शशांक सिंह आणि आशुतोष शर्माच्या फटकेबाजीमुळे गुजरात टायटन्सच्या तोंडातला विजयाचा घास हिरावून घेतला होता. गुणतालिकते गुजरात टायटन्सचा संघ 6 गुणांसह आठव्या, तर पंजाब किंग्सचा संघ 4 गुणांसह 10व्या स्थानी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), शुभमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा.