PBKS vs GT : पंजाब किंग्सने गुजरात विरुद्धचा सामना कुठे गमावला? कर्णधार सॅम करन म्हणाला…

| Updated on: Apr 21, 2024 | 11:41 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 37वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. हा सामना दोन्ही संघांना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. मात्र या सामन्यात गुजरात टायटन्सने 3 गडी राखून विजय मिळवला. खरं तर सॅम करनला नाणेफेकीनंतर प्रथम गोलंदाजी घेण्याची संधी होती. पण त्याने सामन्यानंतर खापर असं फोडलं.

PBKS vs GT : पंजाब किंग्सने गुजरात विरुद्धचा सामना कुठे गमावला? कर्णधार सॅम करन म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला. मात्र कर्णधार सॅम करनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इतकंच काय तर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने अगदी मनासारखं झाल्याचं सांगितलं. दुसरीकडे, पंजाब किंग्सला अवघ्या 142 धावांवर रोखण्यात गुजरात टायटन्सला यश आलं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 3 गडी राखून शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूर्ण केलं. या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली. तर पंजाब किंग्सची नवव्या स्थानी घसरण झाली आहे. या सामन्यातील पराभवानंर पंजाब किंग्स कर्णधार सॅम करनने आपली बाजू मांडली आहे. तसेच या पराभवाचं विश्लेषण करत नेमकी कुठे चूक झाली ते सांगितलं आहे.

पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करन म्हणाला की, “मला असे वाटते की आम्ही 10-15 धावांनी कमी पडलो. गोलंदाजीसह केलेला प्रयत्न अविश्वसनीय होता. वचनबद्धता आणि लढा आश्चर्यकारक होता, परंतु ते पुरेसे नव्हते. अफगाणिस्तानचे फिरकीपटू हे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. दुसरीकडे साई किशोरने खरोखरच चांगली गोलंदाजी केली याचे श्रेय त्यांना आहे. तिसऱ्यांदा आम्ही ही खेळपट्टी वापरली आहे. 160 च्या वर काहीही झाले असते पण तरीही आम्ही चांगली लढत दिली. पॉवरप्लेमध्ये प्रभसिमरन खरोखरच चांगला खेळला पण दुर्दैवाने त्यानंतर आम्ही अनेक विकेट गमावल्या. आता आम्हाला प्रत्येक गेम जिंकायचा आहे.”

पंजाब किंग्सला स्पर्धेत आणखी 6 सामने खेळायचे आहेत. 26 एप्रिलला पंजाबचा सामना कोलकात्याशी होणार आहे. त्यानंतर 1 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स, 5 मे रोजी पुन्हा एकदा चेन्नईशी लढत होईल.9 मे रोजी आरसीबी, 15 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि 19 मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी सामना होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), शुभमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा.