…तर ऋषभ पंतवर एका आयपीएल सामन्याची बंदी! बीसीसीआयच्या कारवाईने दिल्ली कॅपिटल्स संकटात
आयपीएल स्पर्धा दिवसागणित रंगतदार वळणावर येताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. काही संघांच्या पदरी निराशा, तर काही संघांची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्ससोबत काहीच व्यवस्थित होताना दिसत नाही.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकात्याच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांची पिसं काढली. इतकंच काय तर 106 धावांनी पराभव सहन करावा लागल्याने थेट नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे पुढे दिल्ली कॅपिटल्ससाठीचा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. त्यात आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऋषभ पंतला एका चुकीसाठी 24 लाखांचा दंड सहन करावा लागणार आहे. ऋषभ पंतवर आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 24 लाखांचा दंड ठोठावला गेला आहे. आयपीएल 2024 स्पर्धेतील ऋषभ पंतचा हा दुसरा गुन्हा आहे.
ऋषभ पंतला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी धरलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 षटकं ठरलेल्या वेळेत टाकण्यात अपयशी ठरली होती. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी धरलं गेलं होतं. आता ऋषभ पंत स्पर्धेत आणखी एकदा स्लो ओव्हररेटसाठी दोषी धरला गेला तर त्याच्यावर एका आयपीएल सामन्याची बंदी आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.नियमानुसार, एका टीमला 90 मिनिटाक 20 षटकं टाकायची असताता. दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात 20 षटकं टाकण्यासाठी 2 तासांचा अवधी लावला.
ऋषभ पंतला कोलकात्याविरुद्धच्या समन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर इम्पॅक्ट प्लेयर अभिषेक पोरेलसह दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हन खेळाडूंवर 6-6 लाखांचा दंड किंवा सामना फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली आहे. नियमांनुसार, आयपीएल स्पर्धेत तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला तर एका सामन्याची बंदी घातली जाते. त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेयर्ससह प्लेइंग 11 मधील खेळाडूंना 6-6 लाख किंवा सामना फीच्या 50 टक्के दंड भरावा लागेल.
दिल्ली कॅपिटल्स संघ: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, रसिक दार सलाम, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, जेक फ्रेझर-मॅकगर्क, रिकी भुई, कुलदीप यादव, ऱ्हाय रिचर्डसन, शाई होप, ललित यादव, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा